*नगरपरिषद तलावाच्या सुशोभीकरणासाठी ३ कोटी ९३ लक्ष निधी मंजूर!

*नगरपरिषद तलावाच्या सुशोभीकरणासाठी ३ कोटी ९३ लक्ष निधी मंजूर!*  *आमदार देवराव भोंगळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश; राजुरा शहराच्या वैभवात भर पडणार!* राजुरा, दि.15/3/2026 राजुरा शहराच्या हृदयस्थानी असलेल्या आणि शहराची प्रमुख ओळख असलेल्या नगरपरिषदेच्या समोरील 'माजी मालगुजारी तलावा'च्या पुनरुज्जीवनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत या तलावाच्या सुशोभीकरणासाठी ३ कोटी ९३ लक्ष रुपयांच्या निधीला शासनाने मंजुरी दिली असून, आमदार देवराव भोंगळे यांच्या अविरत पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. निधीमुळे गेल्या अनेक वर्षांपासून निधीअभावी रखडलेले तलावाचे काम आता पुन्हा जोमाने सुरू होणार असून राजुरा शहराच्या सौंदर्यात मोलाची भर पडणार आहे. आमदार म्हणून जबाबदारी स्वीकारल्यापासूनच देवराव भोंगळे यांनी या तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू केले होते. यापूर्वी या तलावाचे काम सुरू झाले होते, परंतु तांत्रिक अडचणी आणि निधीच्या कमतरतेमुळे ते बंद पडले. आवश्यक निधीचा प्रस्ताव पर्यावरण विभागाच्या सचिवांकडे प्रलंबित होता. यावर तोडगा काढण्...

बॉक्सिंग क्रीडा प्रकाराला १०० वर्ष पूर्ण – उद्घाटन समारंभ

बॉक्सिंग क्रीडा प्रकाराला १०० वर्ष पूर्ण – उद्घाटन समारंभ 

भद्रावती 
चेतन लुतडे 

विवेकानंद महाविद्यालय, भद्रावती आणि चंद्रपूर जिल्हा बॉक्सिंग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बॉक्सिंग कौशल्य विकास शिबिर कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाला आमदार करण देवतळे उपस्थित होते.   १ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी श्री अरविंद सभागृह, विवेकानंद महाविद्यालय, भद्रावती येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

उद्घाटन समारंभात प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री. करणजी देवतळे, आमदार, वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्र, मा. श्री. पुरूषोत्तमजी वामनराव स्वान, अध्यक्ष, विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट), वरोरा, मा. श्री. राजेशजी भांडारकर, तहसिलदार, भद्रावती, मा. श्री. शिवकुमारजी पाल, आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग प्रशिक्षक, तामिडनाळू आणि मा. श्री. डॉ. एन. जी. उमाटे, प्राचार्य, विवेकानंद महाविद्यालय, भद्रावती यांचा समावेश होता.

बॉक्सिंगच्या या महत्त्वपूर्ण टप्प्यावर प्रशिक्षक आणि खेळाडूंसाठी उत्कृष्ट मार्गदर्शनाची संधी प्रदान केली गेली.

Comments