दहा लाखापर्यंत उत्पन्न कर मुक्त कराकेंद्रीय वित्त मंत्र्यांना खासदारांचे पत्र

दहा लाखापर्यंत उत्पन्न कर मुक्त करा
केंद्रीय वित्त मंत्र्यांना खासदारांचे पत्र

देशाचे आगामी अर्थसंकल्पीय बजेट 1 फेब्रूवारी रोजी केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सितारमण या संसदेत सादर करणार आहे. तत्पुर्वी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी वित्त मंत्र्यांना पत्र लिहित दहा लाख रुपयांपर्यतच उत्पन्न कर मुक्त करण्याची मागणी केली आहे.

मागील दहा वर्षात महागाई गगनाला भिडली असून सामान्य माणूस बचत करण्यास असमर्थ ठरत आहे. सामान्य माणूसाचा कर भरपाई मुळे आर्थिक गणित कोलमडत आहे. देशात श्रीमंत आणि गरीब अशी दरी वाढत चालली असल्याने सामान्यांवर त्याचा आर्थिक भार पडत असल्याने 10 लाखांपर्यत उत्पन्न कर मुक्त करण्याची विनंती खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सितारमण यांच्या कडे केली आहे. येणारे वित्तीय वर्षात दहा लाखापर्यंतचे उत्पन्न कर मुक्त केल्यास सामान्य माणसांचा त्याचा आर्थिक लाभ होणार आहे. त्यामुळे सामान्य नागरीकांचे जिवनमान उंचावण्यास मदत होणार असल्याचे मत देखील खासदार प्रतिभा धानोरकर यांनी वित्त मंत्री यांना लिहिलेल्या पत्र लिहाले आहे. येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या मागणीची देखल वित्त मंत्री घेतात का? हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.


Comments