चिंतामणी क्रीडा मंडळाच्या वतीने भव्य महिला कबड्डी स्पर्धा संपन्न; मराठा लॉन्सर मंडळ नागपूर ठरले विजेते

चिंतामणी क्रीडा मंडळाच्या वतीने भव्य महिला कबड्डी स्पर्धा संपन्न; मराठा लॉन्सर मंडळ नागपूर ठरले विजेते वरोरा (जि. चंद्रपूर) : चिंतामणी क्रीडा मंडळ माढेळी, वरोरा यांच्या वतीने २८ व २९ मार्च रोजी भव्य महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या परिसरात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत तालुका, जिल्हा, राज्य तसेच इतर राज्यांमधील नामांकित क्लब व मंडळातील खेळाडूंनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत कबड्डी सामन्याची शोभा वाढविली. स्पर्धेच्या अंतिम फेरीत मराठा लॉन्सर मंडळ, नागपूर यांनी प्रथम क्रमांक पटकावत ट्रॉफी व ३१ हजार रुपयांचे बक्षीस पटकावले. द्वितीय क्रमांक पी.जी. कॉलेज क्लब, छिदवाडा (मध्य प्रदेश) यांनी मिळवून २१ हजार रुपये तथा ट्रॉफी प्राप्त केली. तृतीय क्रमांक रीवा क्लब (मध्य प्रदेश) यांना ११ हजार रुपये व ट्रॉफी देण्यात आली. चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी व ५ हजार रुपयांचे बक्षीस परभणी कबड्डी मंडळ यांना प्रदान करण्यात आले. तसेच वैयक्तिक स्पर्धांमध्ये अनेक खेळाडूंना प्रोत्साहन बक्षिसे देण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन दिनांक २८ रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन ...

अक्षय सोनटक्के भाजपा कामगार आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी

अक्षय सोनटक्के भाजपा कामगार आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी 
वरोरा : येथील युवा सामाजिक कार्यकर्ते अक्षय सोनटक्के यांची  भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाच्या चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अक्षय सोनटक्के सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहिलेले आहे.ते विदर्भ प्रदेश तेली समाज सेवा संघ व ऑल इंडिया बॅकवर्ड फेडरेशन या संस्थेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष आहे. तसेच ते गोल्डन ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष असून श्री स्वामी समर्थ सहकारी बँकेच्या अध्यक्षस्थानी ते विराजमान आहेत. त्यांच्याकडे वऱ्योऱ्याची राणी समितीच्या अध्यक्षपदाची देखील जबाबदारी आहे. युवा तडफदार आणि कार्यतत्पर सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
 त्यांच्या या कार्याची पावती म्हणून त्यांना जिल्हाध्यक्ष उमेश बोढेकर यांनी त्यांची कामगार मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे. ते वरोरा तालुक्यातील कामगारांना नक्की न्याय देतील अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त केली जात असून त्यांच्या या नियुक्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Comments