चिंतामणी क्रीडा मंडळाच्या वतीने भव्य महिला कबड्डी स्पर्धा संपन्न; मराठा लॉन्सर मंडळ नागपूर ठरले विजेते

चिंतामणी क्रीडा मंडळाच्या वतीने भव्य महिला कबड्डी स्पर्धा संपन्न; मराठा लॉन्सर मंडळ नागपूर ठरले विजेते

वरोरा (जि. चंद्रपूर) : चिंतामणी क्रीडा मंडळ माढेळी, वरोरा यांच्या वतीने २८ व २९ मार्च रोजी भव्य महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या परिसरात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत तालुका, जिल्हा, राज्य तसेच इतर राज्यांमधील नामांकित क्लब व मंडळातील खेळाडूंनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत कबड्डी सामन्याची शोभा वाढविली.

स्पर्धेच्या अंतिम फेरीत मराठा लॉन्सर मंडळ, नागपूर यांनी प्रथम क्रमांक पटकावत ट्रॉफी व ३१ हजार रुपयांचे बक्षीस पटकावले. द्वितीय क्रमांक पी.जी. कॉलेज क्लब, छिदवाडा (मध्य प्रदेश) यांनी मिळवून २१ हजार रुपये तथा ट्रॉफी प्राप्त केली. तृतीय क्रमांक रीवा क्लब (मध्य प्रदेश) यांना ११ हजार रुपये व ट्रॉफी देण्यात आली. चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी व ५ हजार रुपयांचे बक्षीस परभणी कबड्डी मंडळ यांना प्रदान करण्यात आले. तसेच वैयक्तिक स्पर्धांमध्ये अनेक खेळाडूंना प्रोत्साहन बक्षिसे देण्यात आली.

या स्पर्धेचे उद्घाटन दिनांक २८ रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन समारंभास मुख्य उद्घाटक मुकेश भाऊ जीवतोडे (शिवसेना नेते, चंद्रपूर-यवतमाळ जिल्हा), सामाजिक कार्यकर्ते संजय महाजन, शेख जैरुदीन छोटूभाई (जिल्हा शांत समिती सदस्य), माजी सभापती वरोरा तथा माजी संचालक बाजार समिती वरोरा सचिन भाऊ धात्रक (सामाजिक कार्यकर्ते), युवा नेते जितु भाऊ मुथा, मंडळाचे अध्यक्ष डॉ. पंकज जीवतोडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

बक्षीस वितरण कार्यक्रम शेख जैरुदीन छोटूभाई (सामाजिक कार्यकर्ते, वरोरा), सचिन भाऊ धात्रक (सामाजिक कार्यकर्ते), प्रमोद भाऊ वाभिटकर, तुळशीरामजी जीवतोडे, शंकर शिरसागर तथा मंडळाचे अध्यक्ष डॉ. पंकज जीवतोडे व इतर मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आमदार करण भाऊ देवतळे, आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार, खासदार प्रतिभाताई धानोरकर, प्रकाश बाबूजी मुथा (सामाजिक कार्यकर्ते), अतुल भाऊ वारेकर (चिंतामणी हॉस्पिटल) यासह अनेक मान्यवरांनी सहकार्य केले. तसेच डॉ. पंकज जीवतोडे, प्रफुल जीवतोडे, प्रशांत पिपरे, पांडुरंग वाढई, अमोल ठुणेकर, श्री गाडगे, राकेश जीवतोडे व युवा फ्रेंड्स क्रिकेट मंडळ, माढेळी यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

Comments