वरोरा वनपरिक्षेत्रात मोठी कारवाई; शिंदोला गावात १५ हेक्टर राखीव वनजमिनीवरील अतिक्रमण हटविले

वरोरा वनपरिक्षेत्रात मोठी कारवाई; शिंदोला गावात १५ हेक्टर राखीव वनजमिनीवरील अतिक्रमण हटविले वरोरा : वनविभागाने बुधवारी वरोरा वनपरिक्षेत्रातील रामपूर नियतक्षेत्रांतर्गत शिंदोला गावात मोठी धडक कारवाई करत तब्बल १५ हेक्टर राखीव वनजमिनीवरील अतिक्रमण हटवले. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वनविभागाने यापूर्वी १३ अतिक्रमणधारकांना नोटीसा बजावून जमिनीसंदर्भातील कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, संबंधितांनी कोणतेही वैध पुरावे सादर न केल्याने वनविभागाने ही कारवाई केली. सर्व आरोपींवर वनगुन्हा नोंदवण्यात आला आहे. आज पहाटेपासून सुरू झालेल्या या मोहिमेदरम्यान जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने कक्ष क्र. ७ अ मधील बेकायदेशीर बांधकामे आणि अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आली. वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, ही जमीन आता सार्वजनिक हितासाठी वापरली जाणार आहे. अतिक्रमण मुक्त केलेल्या या जागेवर आता गावकऱ्यांच्या मागणीनुसार 'वैरण विकास (गवती कुरण)' प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यामुळे परिसरातील पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता होण्यास मदत होणार असून स्थानिक दुग्ध...

'एकनाथ हिरक आरोग्यवर्ष' म्हणून साजरे होनार.

यंदाच्या  ६० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून 'शिवसेना वैद्यकीय मदत' कक्षाच्या वतीने हे संपूर्ण वर्षे 'एकनाथ हिरक आरोग्यवर्ष' म्हणून साजरे केले जाणार आहे. काल ३१ डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या रक्तदान शिबिरात या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

या उपक्रमाअंतर्गत :- 

✅ ६०० लहान मुलांच्या मोफत हृदय शस्त्रक्रिया (ज्युपिटर हॉस्पिटल, ठाणे)

✅ ६०० दिव्यांग बांधवांना मोफत साहित्य वाटप (आनंद आश्रम, ठाणे)

✅  राज्यात ६० भव्य महाआरोग्य शिबिरांचे आयोजन (संपूर्ण महाराष्ट्र)

✅ ६० हजार नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी (संपूर्ण महाराष्ट्र)

✅ ६० हजार नागरिकांना मोफत चष्मे वाटप (संपूर्ण महाराष्ट्र) 

✅ ६० हजार नागरिकांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया (संपूर्ण महाराष्ट्र)

✅ ६० हजार किलोमीटरची आरोग्य संवाद यात्रा (संपूर्ण महाराष्ट्र)

✅ ६० हजार वृक्ष लागवड (आंबा, चिंच, वड, पिंपळ, लिंब इ)-(संपूर्ण महाराष्ट्र)

सदर उपक्रम राबवण्यात येणार आहेत. या उपक्रमासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. 

याप्रसंगी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे आणि त्यांचे सर्व सहकारी वैद्यकीय सहाय्यक, या उपक्रमात सहभागी होणारे डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी आवर्जून उपस्थित होते.

Comments