अंकुश अवथे चंद्रपूर
चंद्रपूर, दि. 27 : जिल्ह्यातील सर्व वैयक्तिक मच्छिमार/मत्स्यसवंर्धक/ प्रधानमंत्री मत्स्य संवर्धन योजनेचे लाभार्थी तसेच सर्व मच्छिमार सहकारी संस्था / FFPOS यांना कळविण्यात येते की, मत्स्यव्यवसाय विभागाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेण्याकरिता / अर्थसहाय्य मिळणेसाठी नॅशनल फीशर डिजिटल प्लेटर्फाम (NFDP) वर नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. सदरची नोंदणी https:// NFDP.dof.gov.in या लिंकवर स्वत: किंवा नजीकच्या CSC केंद्रात आधार कार्ड, बॅक पासबुक सह जाऊन विनामुल्य करता येईल. तसेच ई–श्रम कार्ड साठीची नोंदणी https://eshram.gov.in या लिंकवर करावी. अपघात गट विमा (GAIS) नोंदणीबाबतची 31 कॉलमची माहिती तसेच K.C.C बाबतची माहिती सहायक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, क्र. 11, येथे सादर करावी, असे जिल्हा मत्स्यविकास अधिकारी यांनी कळविले आहे.
००००००
Comments
Post a Comment