प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

*रेती घाट चालू करा अन्याथा चोरीस परवानगी द्या*सामाजिक कार्यकर्ते शुभम आमने यांची उपविभागीय अधिकाऱ्यांकडे मागणी.

*रेती घाट चालू करा अन्याथा चोरीस परवानगी द्या*
सामाजिक कार्यकर्ते शुभम आमने यांची उपविभागीय अधिकाऱ्यांकडे मागणी.
वरोरा :- 
फक्त बातमी 
         वरोरा आणि भद्रावती तालुक्यात मोठया प्रमाणात रेतीची तस्करी होतांना रोज वर्तमान पत्रात दिसत आहे. रोती चोरी करून विकणाऱ्याच्या किमती देखील खूप असून या वर कोणता पर्याय काढलेला नाही. तहसील कार्यालय नेहमी रेती चे घाट लिलाव करत होते परंतु मागील वर्षापासून रेतीचा घाट लिलाव झाला नाही.त्यामुळे सर्वं सामान्य जनतेची लुट होत असून रेती नसल्यामुळे घर बांधकाम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.त्यासोबत शासनाने घरकुल दिले परंतु असून ते रेती नसल्याने अर्धवट राहिले आहे तर वरोरा भद्रावती तालुक्यातील अनेक लोकांचे घर बांधकाम थांबून आहे.तरी  लवकरात लवकर निर्णय घेऊन रेतीघाट लिलाव करा अन्यथा चोरी करण्यास परवानगी द्या अशी मागणी युवा सामाजिक कार्यकर्ता शुभम शिवशंकर आमने यांनी उपविभागीय अधिकारी यांना केली आहे त्यावेळी दिनेश मोहरे ग्रामीण अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अतुल हेकाड, मयूर पिजदूरकर, विजय चिकटे, विशाल आमने, दिनेश मोडक इ.उपस्थित होते.

Comments