दिंदोडा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीवर्धा व वेणा नदी काठावर,दिंदोडा धरणावरचूल्हा जलावो आंदोलनाचा साहवा दिवस ,लोकप्रतीनिधी व सरकार, प्रशासनाचे दुर्लक्ष !

दिंदोडा प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती
वर्धा व वेणा नदी काठावर,दिंदोडा धरणावर
चूल्हा जलावो आंदोलनाचा साहवा दिवस ,लोकप्रतीनिधी व सरकार, प्रशासनाचे दुर्लक्ष !

फक्त बातमी 
चेतन लूतडे वरोरा 


दिंदोडा प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती चे वतीने दिंदोडा धरणावर बेमुदत चूल्हा जलावो आंदोलन दिनांक २३जानेवारी  २०२५ पासून सुरू करण्यात आले आहे. पाच सहाशे महिला पुरुषांनी उन्ह - थंडीची पर्वा न करता रात्र दिवस ठिया देऊन धरणावर बसले आहेत.१९९३ ते १९९९ याकाळात सरकारने अल्प मोबदला देऊन  जमीन अधिग्रहित केली आहे.त्या नंतर धरणाचे काम सुरू केले नाही.विदर्भ पाठबंधारे  विकास महामंडळाने २०१७ साली काम सुरू केले.कल्याणकारी राज्याच्या सरकारने जमीन अधिग्रहीत करण्याचा व्यापार कधी पासून सुरू केला असा प्रश्न प्रकल्पग्रस्तांना पडला .जर धरणाचे काम २०१७ पासून केले तर २०१३ चे कायद्यानुसार मोबदला दिला पाहिजे असे म्हणत धरणग्रस्तांनी धरणाच्या कामाला विरोध दर्शविला.आणि आंदोलन उभारले.२०२३ साली मार्च महिन्याच्या पहिल्या तारखेला बैलबंडी मोर्चा काढून निवेदन सादर केले.त्यानंतर कार्यकारी अभियंता व अधिक्षक अभियंता यांनी मोबदला देण्यासंदर्भात एक २४०कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला आणि दिंदोडा प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती ला तो प्रस्ताव दाखवण्यात आला .तो प्रस्ताव संघर्ष समितीने मान्य केला .त्यानंतर मुख्य इंजिनियर ,विदर्भ पाठबंधारे विकास महामंडळाचे संचालक यांनी पास करून मुंबई ला अव्वर सचिव जलसंपदा विभागाकडे पाठविण्यात आला आहे.त्यानंतर मुंबई विधान सभेत लोकप्रतनिधीं ,जलसंपदा सचिव ,मुख्यमंत्री यांचे सचिव यांच्ये सोबत बैठक झाली.त्यानंतर तीन वेळा सचिवांना निवेदन देण्यात आले.जलसंपदा मंत्री यांचे दालनात मंत्री महोदयांना निवेदन दिले तरी २४०कोटी रुपयाचे प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली नाही.म्हणून दिंदोडा प्रकल्पग्रस्त वर्धा नदीवर दिंदोडा धरणावर आंदोलनास बसले आहेत. लोकप्रतनिधीं,अधिकारी अजून पर्यंत आंदोलन कर्त्याना भेटायला आले नाहीत.महिला पुरुष,युवक युवती ,लहान मुले भर थंडीत रात्र दिवस आंदोलन करीत आहे. गणराज्य दिवस धरणावर साजरा करण्यात आला.प्रत्येक गावातील धरणग्रस्त भांडीकुंडी आणून चुली पेट वून भाकरी भाजी तयार करून ,झोपड्या बांधून राहुट्या टाकल्या आहेत.वर्धा नदीवर जाऊन आंघोळी करणे,भांडी कुंडी साफ करून दिवस रात्र काढीत आहेत,गाणे ,भजन ,भारुड , दंडार करून लढेंगे जीतेनगे ,२४० कोटी रुपयाचे पॅकेज मंजूर झालेच पाहिजे त अशा घोषणा देत आंदोलन सुरू आहे.

दिंदोडा प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती चे अध्यक्ष पुंडलिक तिजारे,उपाध्यक्ष अभिजित मानडेकर,सचिव मिथुन ठाकरे,जयंत लडके,देवराव सपाट,मनोज कोसुरकर ,संजय देवाडे,राजू भोयर,वामनराव चटप, विठल जुंनघरे ,अनिल नीबरड,अरुण भगत,विद्या तिजारे,धनेश्वर इंगोले,मंजुषा लडके ,छ्याया लुथडे,कुंदा ठोमब्रे,आकांशा कावळे,सुधाकर कावळे ,किशोर वानखेडे,रेखा मांडेकर  तसेच मार्गदर्शक विलास भोंगाडे ठीयादेऊन बसले आहेत.जो पर्यंत २४० कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर होत नाही तोपर्यंत हे चूल्हा जलावो बेमुदत आंदोलन करण्यात येणार आहे.असे एका पत्रका द्वारे कळविण्यात येत असल्याचे प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती ने म्हंटले आहे.
......

Comments