फक्त बातमी
चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री प्रा.डॉ. अशोक उईके यांच्या प्रथम वरोरा येथे आगमनानिमित्त विविध ठिकाणी स्वागत आयोजित करण्यात आले होते.
यावेळी भद्रावती तालुक्यातील कुचना येथे अतुल हेकाड मित्र परिवार व भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे कार्यकर्ते यांच्या वतीने मंत्री, आदिवासी विकास तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा प्रा.डॉ.अशोक उईके यांची चंद्रपूर जिल्हाच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्दल कुचना येथे त्यांचं पुष्पहार, शाल-श्रीफळ व छ. शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन स्वागत करण्यात आले व शुभेच्छा दिल्या.
यावेळी मंत्री महोदयांनी तरुणांच्या पाठीशी राहणार असून त्यांच्या संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी कार्यरत असून जिल्ह्याचा विकास होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी वरोरा विधानसभेचे लोकप्रिय आमदार करण संजय देवतळे, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते सागर कोहळे माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्ते भाजपा युवा मोर्चाचे शुभम आमने, प्रवेश ताकसांडे उपसरपंच कुचना, दत्तात्रय महातळे, आनंदराव ढवस, निशांत चव्हाण,सचिन ढवस, प्रीतम ढवस, प्रतीक वाटेकर,निलेश पारखी इ.मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
या भेटीबद्दल व सत्काराची संधी उपलब्ध करून देण्यात आल्याबद्दल अतुल हेकाड मित्र परिवाराच्या वतीने आमदार करण देवतळे यांचे आभार माणण्यात आले.
Comments
Post a Comment