वरोरा
फक्त बातमी
महारोगी सेवा समिती, आनंदवन द्वारा संचालित व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, संलग्नित आनंद निकेतन कृषी महाविद्यालय, वरोरा येथे भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था, हैदराबाद (मॅनेज), वसंतराव नाईक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, नागपूर (वनामती) आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, चंद्रपूर (आत्मा) यांच्या संयुक्त सहकार्याने ग्रामीण युवकांना कौशल्य आधारित सहा दिवसीय माती व पाणी परीक्षण या विषयावर प्रशिक्षणाचे आयोजन दिनांक 20 जानेवारी ते 25 जानेवारी 2025 या दरम्यान करण्यात आले होते.
सदर प्रशिक्षणाचे उद्घाटन दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी झाले प्रमुख अतिथी म्हणून डॉ. संतोष वाटफळे माजी विदयार्थी तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रादेशिक संशोधन केंद्र शिमला (भा.कृ.अ.प. नवी दिल्ली), तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ विकास व्ही. के. प्रादेशिक संशोधन केंद्र, वेलींगडन तामिळनाडू (भा. कृ. अ.सं.प. नवी दिल्ली ),
डॉ नितीन थोडसरे, यु. पी. एल. मुंबई उपस्थित होते.
उद्घाटकीय सत्राचे अध्यक्ष स्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पोतदार यांनी भूषविले.
या प्रशिक्षणांतर्गत युवकांना तज्ञ मार्गदर्शकां मार्फत माती व पाणी परीक्षणाचे महत्त्व, मृदा व सिंचनाच्या पाण्याचा नमुना घेण्याच्या पद्धती, मृदा परीक्षणात सामू, जमिनीची विद्युत वाहकता, सेंद्रिय कर्ब, मुक्त चुना, उपलब्ध नत्र, उपलब्ध स्फुरद, उपलब्ध पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्य काढण्याचे महत्त्व याबद्दल सविस्तर मार्गदर्शन तसेच वरील घटक मातीतून काढण्याबद्दल प्रात्यक्षिक घेण्यात आले. पाणी परीक्षणामध्ये सिंचनाच्या पाण्याची गुणवत्ता ठरविण्यासाठी पाण्याचा नमुना विविध घटकासाठी तपासल्याबद्दल मार्गदर्शन व प्रात्यक्षिक घेण्यात आले. सदर प्रशिक्षणात माती व पाणी चे नमुने परिक्षण करून मृदा आरोग्य पत्रिका व सिंचनाच्या पाण्याची तपासणी अहवाल विद्यार्थ्यांकडून तयार करून घेण्यात आला तसेच वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या अन्नद्रव्यांचे कार्य, कमकरते ची लक्षणे , माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा उभारण्यासाठी लागणारा कर्जपुरवठा कशाप्रकारे करावा, याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणात जिल्ह्यातील 35 प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
समारोपीय कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून श्री. सुधाकर कडू , विश्वस्त, म.से.स. वरोरा, डॉ. मृणाल काळे , प्राचार्य , आ. नि. महा. वरोरा तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुहास पोतदार यांनी मार्गदर्शन करून प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात केले.
प्रशिक्षणाचे मुख्य समन्वयक तथा प्राचार्य आनंद निकेतन कृषी महाविद्यालय वरोरा डॉ सुहास पोतदार तसेच सह समन्वयक तथा सहाय्यक प्राध्यापिका मृदा विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग सौ. पल्लवी घोरपडे व सौ. एच. एम. पोतदार प्राचार्य आनंदवन कृषी तंत्र निकेतन आनंदवन वरोरा यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.
Comments
Post a Comment