पोलीस आरोपीच्या शोधात.
वरोरा 23/1/25
चेतन लूतडे
रेतीची अवैध वाहतूक करतानारे ट्रक महसूल अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन तहसील कार्यालय वरोरा परिसरात जमा केले होते . यानंतर ताब्यात घेतलेले दोन हायवा ट्रक बेपत्ता झाल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी (दि. २२) उघडकीस आला.
तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार उल्हास लोखंडे व महसूल विभागााचे पथक मंगळवारी (दि. २१) रात्री गस्त घालत होते. दरम्यान, त्यांना शेगाव बसस्थानकाजवळ एम.एच. २७ बीएक्स ४७०० आणि एम.एच. ४० सीटी १८०४ क्रमांकाचे दोन हायवा ट्रक आढळून आले होते. चौकशी केल्यानंतर दोन्ही वाहन चालकांकडून रेतीचा परवाना आढळून आला नाही. त्यामुळे रेती भरलेले हायवा ट्रक रात्रीच वरोरा तहसील कार्यालय परिसरात जमा करायला लावले. मात्र, पहाटे हे ट्रक कार्यालयाच्या परिसरातून बेपत्ता झाले.
जप्त केलेले दोन्ही ट्रक तहसील परिसरात लावल्यानंतर चाव्या नायब तहसीलदार लोखंडे यांनी आपल्या ताब्यात घेतल्या. कारवाई करून घरी गेल्यानंतर हे ट्रक बेपत्ता झाले. वाहनांच्या चाव्या अधिकाऱ्यांकडेच असताना बेपत्ता झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
हायवा ट्रक चालकांना अटक करण्यासाठी पोलिस मागावर आहे.याप्रकरणी नायब तहसीलदार लोखंडे यांनी वरोरा पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
Comments
Post a Comment