सरपंच महोत्सव 2025सरपंचांचा महाकुंभ वरोरा शहरात साजरा.महिलांच्या कबड्डी सामन्याने प्रेक्षकांना रिझवले.

सरपंच महोत्सव 2025
सरपंचांचा महाकुंभ वरोरा शहरात साजरा.
महिलांच्या कबड्डी सामन्याने प्रेक्षकांना रिझवले.

चेतन लूतडे वरोरा 31/1/25

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सरपंच महोत्सवाची सुरुवात करण्यात आली असून. जिल्ह्यातील व जिल्हा बाहेर सरपंच तथा सदस्य या महोत्सवात हजेरी लावून आपला आनंद द्विगणित करीत असताना दिसत आहे. 

वरोरा शहरामध्ये जुनी कॉटन मार्केट ग्राउंड वर तीन दिवसीय सरपंच महोत्सव मेळाव्याचे आयोजन  करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार प्रतिभाताई धानोरकर आणि आमदार देवरावजी भोंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोली खासदार नामदेवजी किरसान  उपस्थित होते.

जिल्ह्यातील सरपंचांना एकत्रित करून गाव विकासासह जिल्हा विकासाच्या दृष्टिकोनातून समन्वय साधने या हेतूने राज्यातील पहिला प्रयोग वरोरा येथे घेण्यात आला. सरपंच महोत्सव जिल्हा चंद्रपूर 2025 दरम्यान विविध कार्यक्रम व स्पर्धा आयोजित  करून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. 
या तीन दिवसीय कार्यक्रमांमध्ये दिवसभरात शेतकऱ्यांसाठी स्टॉल प्रदर्शनी , महिला व पुरुष कबड्डी सामने, संगीत खुर्ची, नृत्य स्पर्धा, चालता बोलता प्रश्नमंजुषा, अशा अनेक स्पर्धा सरपंच तथा सदस्या करीत आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये सरपंच महिला कबड्डी सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती. हे सामने 30, 31,1 या तारखे मध्ये होत असून. सरपंच महोत्सव समितीचे अध्यक्ष गणेश चवले यांनी वरोऱ्यातील समस्त  जनतेला महोत्सवात परिवारासह भेट देण्याचे आव्हान केले आहे.
यासाठी जिल्ह्यातील नामवंत प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, पत्रकार, गावकऱ्यांनी हजेरी लावली आहे.

आयोजन समितीचे अध्यक्ष गणेश चवले, सचिव रवींद्र भोयर, उपाध्यक्ष नंदलाल टेंमूर्डे, कोषाध्यक्ष राजेंद्र चिकटे, हरीश जाधव , पुरुषोत्तम पावडे, नर्मदाताई बोरेकर, शुभांगी दातारकर यांनी समस्त सरपंच व उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य यांना परिवारसह या महोत्सवात आमंत्रित केले आहे.
कार्यक्रमादरम्यान वरोरा माजी नगराध्यक्ष एहेतेशाम अली यांचा सत्कार करण्यात आला.
................

Comments