एकोणा खाण परिसरात चहा पिताना वाद; लाठीहल्ल्यात ट्रकचालक जखमी

एकोणा खाण परिसरात चहा पिताना वाद; लाठीहल्ल्यात ट्रकचालक जखमी. कोळसा वाहनाचा नंबर लावण्यावरून वाद. खान प्रशासनाचे दुर्लक्ष वरोरा, ता. ११ एप्रिल : वरोरा येथील एकोणा माईन्स गेट क्रमांक दोन येथे काल सकाळी अकरा वाजता चहा पिताना झालेल्या वादातून तिघांनी ट्रकचालक सूर्यप्रतापसिंग कृष्णगोपाल सिंग (वय २५, रा. बिलघाडी, ता. गूनोर, जि. पन्ना, मध्यप्रदेश) यांच्यासह चार जणांवर लाठीने हल्ला केला. या हल्ल्यात सूर्यप्रतापसिंग यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली असून, हाताला सूज आली आहे. पोलिसांनी मनोजकुमार चंद्रवंशी, सन्नीकुमार चंद्रवंशी व सहँदरकुमार बंशी या तिघांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम  ११८(१),(२), ३५१,३५२ व जीवे मारण्याच्या धमकीच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी सूर्यप्रतापसिंग यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, आदल्या दिवशी सकाळी चार वाजता कोळसा वाहनाचा नंबर लावण्यावरून या आरोपींनी त्यांच्या साथीदार विवेक हरीसिंग याला मारहाण केली होती. ती बोलण्यासाठी सूर्यप्रतापसिंग हे आपल्या चार साथीदारांसह गेले असता, आरोपींनी कोणतीही चौकशी न करता हातातील लाकडी दांड्या...

वडिलांशी एकनिष्ठ राहिलेल्यांच्या सदैव पाठीशी राहणार --- आमदार करण देवतळे

वडिलांशी एकनिष्ठ राहिलेल्यांच्या सदैव पाठीशी राहणार --- आमदार करण देवतळे 

 वरोरा : वडील स्व. संजय देवतळे हे कोणत्याही पदावर नसताना देखील अनेक व्यक्ती त्यांच्या सोबत होते.भंवरलाल चौधरी हे त्यापैकी एक होते. पडतिच्या काळात अशाप्रकारे सोबत राहणाऱ्या निष्ठावंत व्यक्तीच्या पाठीशी मी व माझे कुटुंब नेहमी खंबीरपणे उभे राहील असा विश्वास आमदार करण देवतळे यांनी उद्योजक भंवरलाल चौधरी यांच्यातर्फे आयोजित सत्काराला उत्तर देताना दिला. याप्रसंगी आमदार करण देवतळे यांच्या हस्ते भंवरलाल चौधरी संचालित श्री श्याम ग्रॅनाईट, स्टाईल व बीएलसी ,जेसीबी स्पेअर पार्ट शोरूमचे उद्घाटन पार पडले. गुरुवार दि.१२ डिसेंबर रोजी नागपूर- चंद्रपूर महामार्गावरील चिनोरा येथील चौधरी यांच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून वणी येथील माजी आमदार संजय रेड्डी बोदकुरवार ,श्वेता संजय देवतळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. विजय देवतळे , माढेळी येथील उद्योजक  प्रकाश मुथा, माजी सैनिक मनोज उर्फ गुलाबराव जीवतोडे, रमेश राजुरकर, भद्रावती येथील प्रशांत शिंदे, सुनील कटारिया, उमेश शर्मा ,अमोल मुथा, प्रमोद मगरे, बाळू चिंचोलकर, संजय घागी उपस्थित होते. सदर कार्यक्रमात सर्वच प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आमदार करण देवतळे यांचे आगमन होताच रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आलेल्या जेसीबीतून त्यांच्यावर पुष्पवर्षाव करण्यात आला. तसेच ढोल ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करून भंवरलाल चौधरी यांनी नवनिर्वाचित आमदार करण देवतळे यांचा शाल ,श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. कार्यक्रमाचे संचालन गिरीधर जाखोटिया यांनी केले. तर उपस्थितांचे आभार भंवरलाल चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाला शहर व परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते.

Comments