वरोरा भद्रावती विधानसभेतील बीजेपीच्या शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश.

वरोरा भद्रावती विधानसभेतील बीजेपीच्या शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

ताई आणि भाऊ यांच्या विकास कामावर जनता आशीर्वाद नक्की देणार.
प्रवीण काकडे

वरोरा 
चेतन लुतडे 

वरोरा विधानसभेमध्ये बहुरंगी लढत जरी दिसत असली तरी मुख्य राष्ट्रीय पक्ष भाजप व काँग्रेस मध्ये थेट लढत दिसत आहे. 
महाराष्ट्रात मुख्य प्रचाराला सुरुवात झाली असून पदाधिकाऱ्यांची घरवासी काही ठिकाणी होत आहे तर नवीन पदाधिकारी काँग्रेस आणि भाजपा पक्षामध्ये प्रवेश करताना दिसत आहे. 
शुक्रवारला वरोरा येथील काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रवीण सुरेश काकडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजप पक्षातील पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. काँग्रेस पक्षाचे समर्थक सरकार ग्रुपचे अध्यक्ष काशीफखान यांच्या नेतृत्वात 900 कार्यकर्त्यांचा महाविकास आघाडीमध्ये प्रवेश घेण्यात आला. हा वरोरा विधानसभेतील , राजकीय समीकरणाचा भूकंप असून विधानसभेमध्ये काँग्रेस मजबूत स्थितीमध्ये दिसत आहे. यामध्ये मुकेश चांदेकर यांचे 200 कार्यकर्ते,दीपक चव्हाण यांचे 200 कार्यकर्ते  ,कपिल राऊत 100 कार्यकर्ते ,मोशिन शेख 50 कार्यकर्ते ,करण पन्द्रम 50 कार्यकर्ते ,आर्येन हिवरे 50 कार्यकर्ते ,मनोज वडारकर 50कार्यकर्ते ,अजय किल्लारे 50 कार्यकर्ते ,शारुक शेख पंकज यादव 30 कार्यकर्ते सह प्रवेश घेत प्रवीण भाऊ काकडे यांचे हात मजबूत केले आहे. काकडे यांना विजयी करण्यासाठी युवा कार्यकर्त्यांनी कंबर कसली असून एक हाती विजय मिळवण्याचा संकल्प युवकांनी केला आहे.

खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या मार्गदर्शनात त्यांचे मोठे बंधू काँग्रेस उमेदवार प्रवीण काकडे यांच्या नेतृत्वात  शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश घेतल्याने विधानसभेमध्ये काकडे यांनी आपले शक्ती प्रदर्शन दाखवून दिले आहे. ताई आणि भाऊंनी केलेल्या विकास कामाच्या जोरावर नक्की विजय प्राप्त करू असा विश्वास प्राप्त करत विधानसभेमध्ये प्रचाराचा झंजावत सुरू केला आहे.

____________जाहिरात

Comments