कुणबी समाजाबद्दल आपत्ती जनक वक्तव्य करणाऱ्या कृत्याबद्दल निषेध. वणी येथील घटनेचा चंद्रपूर जिल्ह्यात तीव्र निषेध. धनोजे कुणबी समाजातर्फे पोलिसात तक्रार दाखल.

कुणबी समाजाबद्दल आपत्ती जनक वक्तव्य करणाऱ्या कृत्याबद्दल निषेध. 

वणी येथील घटनेचा चंद्रपूर जिल्ह्यात तीव्र निषेध. 

धनोजे कुणबी समाजातर्फे पोलिसात तक्रार दाखल.

वरोरा 
चेतन लुतडे 

     सोमवार दिनांक 4 नोव्हेंबर 2024 ला एका प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी कुणबी समाजावर करण्यात आलेल्या अपमानास्पद व घृणास्पद वक्तव्याचा निषेध करीत समाज बांधवांनी वरोरा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली.
       
वरोरा धनोजे कुणबी समाजातर्फे वरोरा येथे तक्रार दाखल करीत तीव्र निषेध व्यक्त केला. यावेळी धनोजे कुणबी समाजाचे तालुका अध्यक्ष एडवोकेट गजानन बोढाले यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्या व्यक्तीस कायदेशीर कारवाई करण्यात आली पाहिजे अन्यथा समस्त कुणबी समाजातर्फे भव्य आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे. अशा प्रवृत्तीच्या लोकांना आत्ताच कारवाई करणे आवश्यक असल्याची बाब मांडली. 
अँड.पुरुषोत्तम सातपुते जिल्हाध्यक्ष समाजाविषयी केलेल्या वक्तव्य निषेधार्थ आहे. याविषयी वणी पोलीस पोलीस स्टेशनला तक्रार झाली असून कुणबी समाज प्रत्येक जिल्ह्यात जाऊन संघटना स्थापन करून याविषयीची तक्रार आम्ही दाखल करणार असल्याचे मत व्यक्त केले.

शिवसेना जिल्हाध्यक्ष नितीन मते यांनी सुद्धा या वृत्तीचा निषेध दर्शवला असून अशा प्रवृत्तीच्या लोकांना कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे असे मत व्यक्त केले. 

अनिल धानोरकर (बहुजन समाज आघाडी) यांनी माझा समाजाला पाठिंबा असून अशा प्रवृत्ती बद्दल वरोरा व भद्रावती क्षेत्रात तीव्र निषेध व्यक्त केला आहे. आता माफी नाही तर कारवाई झाली पाहिजे असे मत व्यक्त केले.
यावेळी धनुजी कुणबी समाजाचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम सातपुते, अध्यक्ष गजानन बोढाले , बंडूभाऊ देऊळकर, नितीन मध्ये, अनिल धानोरकर, जयंत टेंमूर्डे , बाबा आगलावे, राहुल पावडे, परीक्षित एकरे  आदी समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Comments