वरोरा
चेतन लुतडे
वरोरा विधानसभा मतदारसंघात सोमवारी तीन वाजेपर्यंत सहा उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहे. यानंतर लगेच उपविभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत उमेदवारास चिन्ह वाटप करण्यात आले.
वरोरा विधानसभेत 18 उमेदवारांनी कंबर कसली असून अपक्ष उमेदवारास निवडणूक चिन्ह मिळाल्याने निवडणुकीचा प्रचार सुरू केला आहे. वरोरा विधानसभेत सहा जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला असून
यामध्ये जन आक्रोश संघटनेचे अमोल बावणे, महेश ठेंगणे, भाजपा नेते नरेंद्र जीवतोडे , भाजपा विधानसभा प्रमुख रमेश राजुरकर , राष्ट्रवादीचे नेते जयंत टेंमूर्डे, रंजना पारशीवे यांनी अर्ज वापस घेतला आहे.
यामध्ये माजी मंत्री हंसराज अहिर यांनी मध्यस्थी करत भाजपा नेते यांना स्वगृही वापस आणले. माजी मंत्री अहिर यांच्या पुढाकाराने वरोरा विधानसभेत करण देवतळे यांच्या उमेदवारीला भक्कम पाठबळ उभे केले असून विजयी होण्याचा संकल्प त्यांनी रचला आहे. माजी मंत्री अहिर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत नरेंद्र जिवतोडे , रमेश राजुरकर, अमोल बावणे यांनी अर्ज मागे घेतले.
अपक्ष उमेदवारामध्ये मुकेश जीवतोडे यांना प्रेशर कुकर , चेतन खूटेमाटे यांना ऊस शेतकरी, राजू गायकवाड यांना ऑटो, विनोद खोब्रागडे यांना रोलर चिन्हे मिळाली आहेत.
वरोरा विधानसभेत काँग्रेस उमेदवार प्रवीण काकडे, भाजपा उमेदवार करण देवतळे, बहुजन वंचित आघाडीचे अनिल धानोरकर, अपक्ष उमेदवार चेतन खूटेमाटे, अपक्ष उमेदवार मुकेश जीवतोडे, प्रहार संघटनेचे उमेदवार अहेतेशाम अली, अपक्ष उमेदवार विनोद खोब्रागडे या नावांची चर्चा ग्रामीण व शहरी भागात जोर धरू लागली आहे.
Comments
Post a Comment