आनंदवन बुधवार बाजारात वजन काटे माप अधिकाऱ्याचे दुर्लक्ष*भाजीपाल्याच्या दुकानदारांच्या काट्यांवर स्टीलच्या भांड्याचे वजन*

आनंदवन बुधवार बाजारात वजन काटे माप अधिकाऱ्याचे दुर्लक्ष

भाजीपाल्याच्या दुकानदारांच्या काट्यांवर स्टीलच्या भांड्याचे वजन

वरोरा 
चेतन लुतडे 

वरोरा शहरालगत आनंदवन येथे भाजीपाल्याचा दर बुधवार व रविवारी बाजार भरत असतो. या बाजारात हिंगणघाट येथील बहुतांश व्यापारी भाजीपाला घेऊन येतात. त्यांच्या या काट्यावर स्टीलचे जड भांडे ठेवल्याने वस्तू कमी येत आहे. याबद्दल ग्राहकाने शंख निर्माण केल्यास अपशब्द बोलून दुसरीकडे जा. कोणाला घेऊन यायचे तर घेऊन या. या शब्दात ग्राहकांना मानसिक ताण दिला जात आहे. 
वजन माफ काटे अधिकारी निद्रा अवस्थेत असून बहुतांश काटे तपासले सुद्धा नाहीत त्यामुळे भांड्यांच्या वजनासोबत वस्तू खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे भाजीपाला कमी बसत असून सहसा गरीब वर्गातील लोकांना हे कळूनही येत नाही. 
शिक्षित व्यक्तींनी सांगितले असता "तुमच्याने  जे होते ते करून घ्या" अशे बिनधास्त वाक्य ऐकायला मिळतात. यावरून लक्षात येते की अधिकारी याकडे सर्रास दुर्लक्ष करीत आहे. 
एका महिलेने अर्धा किलो वांगी घेतले होते. त्यामध्ये 0.17 स्टीलच्या वाट्याचे वजन घेऊन वांगी देण्यात आले. जेव्हा ग्राहकाच्या लक्षात आले तेव्हा लगेच वांगी हातातून हिसकून वांग्याचे टोपलीमध्ये फेकण्यात आले. याबाबत सावरा सावर करण्याचा दुकानदाराने प्रयत्न केला. यानंतर बरीच बाचाबाची झाली. असे अनेक प्रकार बुधवार व रविवार बाजारात होत असून याकडे लक्ष देण्यासाठी कोणीही वाली नाही. येथील प्रशासन अशा दुकानदाराला आश्रय देत असून थोडस्या पैश्यासाठी गावाची प्रतिमा मलीन होत आहे.

मुळात या ठिकाणी बरेच मोबाईल व दुचाकी चोरीला जात आहे. 
हा सगळा प्रकार महिला वर्गात जास्त प्रमाणात होत असून सर्वसामान्य महिला हा अपमान सहन करून मुक्याट्याने घरी वापस येतात. हा सर्व प्रकार सर्रास सुरू होत असून यावर कोणाचेच नियंत्रण राहिले नाही.

या ठिकाणी केमिकलने पिकवलेले फळे सुद्धा मोठ्या प्रमाणात येत असतात त्यामुळे या सर्वांवर नियंत्रण असणे आवश्यक आहे. एक्सपायरी संपलेले बंद वस्तू सुद्धा मोठ्या प्रमाणात विकायला येतात. मासाचे तुकडे अस्ताव्यस्त पडून असते. अजून पर्यंत एकही कारवाई पुढे आलेली नाही. त्यामुळे बरीच चर्चा ऐकायला मिळते.

या सर्व बाबीकडे संबंधित विभागाने त्वरित लक्ष देण्याची गरज आहे.


Comments