तालुका क्रीडा संकुल बनले आर्थिक व्यापाऱ्याचे मैदान .सहा दिवस चालणार सांस्कृतिक मेळावा.त्वरित मैदान खाली करून देण्यासाठी खेळाडूंची मागणी.

तालुका क्रीडा संकुल बनले आर्थिक व्यापाऱ्याचे मैदान

सहा दिवस चालणार सांस्कृतिक मेळावा.

त्वरित मैदान खाली करून देण्यासाठी खेळाडूंची मागणी.

फक्त बातमी 
चेतन लुतडे वरोरा 

वरोरा शहरातील खेळाडुंना खेळांचा सराव करण्यासाठी एकमेव तालुका किडा संकुल उभारले आहे. या भव्य क्रीडांगणावर रोज शेकडो विद्यार्थी वेगवेगळया खेळांचा सराव करून आपापल्या खेळात निपुण होण्याचा प्रयत्न करत असतात. एखादा खेळाडु राज्य स्तरावर किंवा राष्ट्रीय स्तरावर पोचला तर त्याचे त्याला प्रमाणपत्र मिळतात. एखादा विद्यार्थी शालेय स्तरावर खेळला तर १० गुण प्राप्त होतात. किंवा खेळाडुंने खेळात प्राविण्य प्राप्त केले तर २० गुणाचा शिक्षणात समावेश केला जातो. सदर क्रीडा संकुलवर दरवर्षी मनोरंजनाच्या कार्यक्रमाला प्रशासन मंजुरी देवून विद्यार्थ्याच्या भवितव्यासोबत खेळत असून भविष्याचा खेळखंडोबा करत असल्याच्या भावना खेळाडूंनी व्यक्त केले आहे. 
खेळाडूंनी आपल्या तक्रारीतून मैदान खाली करून देण्याची मागणी तहसीलदारां जवळ केली असून  लवकरात लवकर कीडा संकुल खाली करून पुर्ववत ग्राऊंड उपलब्ध करून द्यावे ही विनंती केली आहे. 
किंवा मनोरंजनासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावे अशी मागणी होत आहे. याबाबत आलेख रट्टे व त्यांच्या सहकाऱ्यांनी निवेदन सादर केले आहे.

एक पोस्टर ची किंमत 21000 रूपये, एका स्टॉल ची किंमत 10000रू, स्क्वेअर फुट प्रमाणे जागेचा भाव ठरल्याचे समजते. खेळाडूंच्या जागेचा वापर आर्थिक व्यापार करण्यासाठी जास्त प्रमाणात होत असून बऱ्याच दिवसापासून खेळाडू याबद्दलचा आवाज उठवत आहे. काही दिवसांपूर्वीच  या ठिकाणची कंपाउंड दुरुस्ती करण्यासाठी  मोठा खर्च सुद्धा करण्यात आला होता. मात्र प्रशासनाची त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात सर्वखेळाडू  प्रशासनाचा निषेध नोंदवणार आहे. 
सध्या ग्राउंड वर जाण्यासाठी किंमत मोजावी लागत आहे. सायकल ठेवण्यासाठी सुद्धा पैसे लागणार आहेत. ग्राउंड वरती भले मोठे गड्डे पडणार आहेत. त्यामुळे धर्मदायूक्त अधिकाऱ्यांनी या संस्थेचा आढावा घेऊन त्या पद्धतीचे  ठराव मागून घेतले पाहिजे. संबंधित अधिकाऱ्याने तात्काळ दखल घेत याबाबतचा निर्णय लावावा अशी मागणी खेळाडूंकडून होत आहे. 


जाहिरात




Comments