डॉक्टर चेतन खूटेमाटे विधानसभेत बदल घडविणार.

डॉक्टर चेतन खूटेमाटे विधानसभेत बदल घडविणार.

सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे नाही.

वरोरा 
चेतन लुतडे 

वरोरा विधानसभेची रणधुमाळी जोरात सुरू असून उमेदवार  भव्य रॅली ,कॉर्नर सभा, बॅनर, सोशल मीडिया, प्रत्येक माध्यमातून प्रचार सुरू आहे. 
या विधानसभेत उच्चशिक्षित उमेदवार म्हणून डॉक्टर चेतन खूटेमाटे यांनी चला बदल घडवूया या अभियानांतर्गत गेल्या सहा महिन्यापासून अविरत कार्य करीत आहे. 

या विधानसभेनिमित्त त्यांच्याकडून बऱ्याच प्रश्नांनाचे उजाळा देण्याचा प्रयत्न केला. 
शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही. मिळाले तर फक्त दलालाच्या फायद्याचे असते . त्यामुळे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे नाही अशी परखड मत त्यांनी व्यक्त केले.  शिक्षणाचे खासगीकरण मोठ्या प्रमाणात होत असून सरकारी यंत्रणा कोलमडली आहे. आरोग्याच्या नावावर थातूरमातूर सरकारी दवाखाने सुरू आहेत. ती बदलण्याची गरज आहे. बेरोजगारीच्या नावावर युवकांचे शोषण सुरू आहे.
असे बरेच प्रश्न समाजात प्रलंबित असून सरकार हिताचे नाही असे मत व्यक्त करत विधानसभेमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून मी बदल घडविणार असा ठाम विश्वास डॉक्टर खूटेमाटे यांनी दाखविला आहे.


वरोरा भद्रावती विधानसभेमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आल्यास नक्कीच शेतकरी, युवक आणि आरोग्य या बाबींवरती प्रभावी काम करणार असून जाती-पातीचे राजकारण होऊ देणार नाही. गरजूंना मदत करण्याची आवश्यकता आहे. आमदाराच्या माध्यमातून विधानसभेत प्रश्न उपस्थित करून आपल्या मागण्या पूर्ण करण्याचा  शंभर टक्के प्रयत्न करीन असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. 
शेतकऱ्यांसाठी कापूस आधारित सूतगिरणीची योजना आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात आली पाहिजे यासाठी प्रयत्न करीन. नवीन कंपनीमध्ये स्थानिकांना रोजगार देण्यावर भर दिला जाईल. त्यामुळे जनतेला आव्हान केले आहे तू वरोरा भद्रावती विधानसभेमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून डॉक्टर चेतन खूटेमाटे  यांना जनता भरभरून आशीर्वाद देतील अशी इच्छा व्यक्त केली.



Comments