अज्ञात वाहनाने 23 वर्षीय युवकास चिरडले**भद्रावती शहरातील घटना*

*अज्ञात वाहनाने 23 वर्षीय युवकास चिरडले*

*भद्रावती शहरातील घटना*

अतुल कोल्हे भद्रावती :-
            मालकाच्या घराकडून दुचाकीने आपल्या घराकडे जात असलेल्या एका 23 वर्षीय युवकाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.  
          सदर घटना दिनांक २४ रोज रविवारला सकाळी ६ वाजता शहरातील चंद्रपूर-नागपूर हायवेवरील भूमी अभिलेख कार्यालयाजवळ घडली. पंकज सुभाष मरसकोल्हे, वय 23 वर्ष, राहणार भोजवार्ड,  भद्रावती असे मृतकाचे नाव आहे. सदर मृतक हा ट्रॅक्टर चालक होता. तो शहरातील सुमठाना येथे राहणाऱ्या आपल्या मालकाकडे गेला होता. सकाळी मालकाच्या घरून एम.एच. 34 पी 1260 या क्रमांकाच्या दुचाकीने आपल्या घराकडे परत येत असताना अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जबर धडक दिली. त्यात तो जागीच मरण पावला. सदर घटनेची माहिती प्राप्त झाल्यानंतर भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.
जाहिरात

Comments