युथ स्पोर्टिंग क्लब भद्रावती (BYSC) च्या खेळाडूची तब्बल 28 वर्षानंतर महाराष्ट्र राज्य शालेय व्हॉलीबॉल संघात निवड*

*युथ स्पोर्टिंग क्लब भद्रावती (BYSC) च्या खेळाडूची तब्बल 28 वर्षानंतर महाराष्ट्र राज्य शालेय व्हॉलीबॉल संघात निवड*

अतुल कोल्हे भद्रावती :-
                राज्यस्तरीय सतरा वर्षाखालील मुलांच्या शालेय व्हॉलीबाल स्पर्धा नागपूर येथे दिनांक  4, 5 व 6 ऑक्टोंबर 2024 रोजी संपन्न झाल्या. यामध्ये तब्बल 28 वर्षानंतर भद्रावती युथ स्पोर्टिंग क्लब (BYSC) चा खेळाडू हर्षित प्रवीण कवाडे याची महाराष्ट्र राज्य शालेय व्हॉलीबॉल संघात निवड झाली असून हा संघ बरेली (UP) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग घेणार आहे. विशेष म्हणजे भद्रावतीच्या व्हॉलीबॉल इतिहासातील हा तब्बल 28 वर्षानंतरचा दुसरा खेळाडू आहे. ज्याची निवड महाराष्ट्र राज्य शालेय व्हॉलीबॉल संघात झाली आहे. या यशाचे श्रेय BYSC चे प्रशिक्षक व मार्गदर्शक प्रवीण झाडे, स्वप्नील उमरे यांना दिले असुन हर्षित च्या पुढील वाटचालीस व उज्वल भविष्यासाठी क्लबचे वरिष्ठ खेळाडू आनंद पिदुरकर ( महाराष्ट्र राज्य पोलिस PSI ), विवेक गोहणे ( O.N.G.C ), गोपाल आत्कुलवार (महाराष्ट्र राज्य पोलिस चंद्रपूर ), पिंटू आसुटकर ( महाराष्ट्र राज्य पोलिस चंद्रपूर ), भाऊराव कुत्तरमारे, सागर भट ( उद्योजक ), अतुल चौधरी ( सी.आर.पी.एफ ), गणेश काळे ( उद्योजक ), योगेश गाडगे, जयेश टेके, नितीन जगताप, शैलेश नन्नावरे ( शिक्षक ), राजू पडोळे (JSW), प्रभाकर वाणी, दिवाकर दरेकर, विजय शेरकी, द्रोविश पेटकर व क्लब च्या सर्व  खेळाडूनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

Comments