वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

नितीन मत्ते शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर यांच्या नेतृत्वात वरोरा विधानसभा क्षेत्रातील शेकडो शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी मुंबईच्या दिशेने रवाना*

*नितीन मत्ते शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर यांच्या नेतृत्वात वरोरा विधानसभा क्षेत्रातील शेकडो शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी मुंबईच्या दिशेने  रवाना*

फक्त बातमी 

* मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे आदेशाने, माननीय किरण भाऊ पांडव पूर्व विदर्भ समन्वयक यांचे सूचनेनुसार, माननीय किशोरजी राय जिल्हा संपर्कप्रमुख चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात शिवसेना दसरा मेळावा आझाद मैदान मुंबई येथे श्री नितीन मते शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर यांचे नेतृत्वात चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा विधानसभा क्षेत्रातील शेकडो शिवसैनिक मुंबईच्या दिशेने आज रवाना झाले माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे विचार ऐकण्यासाठी शिवसेनेचा कार्यकर्ता नेहमी आतुर असतो ती संधी उद्या दसऱ्याच्या दिवशी होणाऱ्या मेळाव्यानिमित्त शिवसैनिकांना मिळणार आहे . या संधीचा लाभ घेण्यासाठी सर्व शिवसैनिक श्री नितीन मते शिवसेना जिल्हाप्रमुख यांच्या नेतृत्वात मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे

Comments