विद्यार्थ्यांचे नाव विचारूनच पुस्तके विक्री; पालकांची अडचण वाढली.बनावट बुक डेपो उभारून पुस्तक संच विकत घेण्याची शक्ती.

विद्यार्थ्यांचे नाव विचारूनच पुस्तके विक्री; पालकांची अडचण वाढली. बनावट बुक डेपो उभारून पुस्तक संच विकत घेण्याची शक्ती. वरोरा, (२७/३/२६): शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वरोरा शहरातील ज्ञानार्जनाच्या आड आता आर्थिक लाभाचा खेळ सुरू झाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात खाजगी व सरकारी शाळांमध्ये पुस्तके, गणवेश यांची विक्री करण्यावर बंदीची मोहीम सुरू असतानाही, एका शाळेने नवा ‘आडमार्ग’ शोधून पालकांना पुस्तके खरेदीसाठी बाध्य केले आहे. बनावट बुक डेपो उभारून पुस्तक संच विकत घेण्याची शक्ती करण्याचा प्रकार उजेडात आला आहे. मागील काही दिवसांपासून शाळांमधून पुस्तके व गणवेश विक्रीवर प्रशासनाने कारवाई केली होती. त्यामुळे शाळांनी त्वरित विक्री बंद केली होती. मात्र, आता शाळेने बनावट बुक डेपोच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची नावे तपासून पुस्तके विक्रीची यंत्रणा उभी केली आहे. २७ मार्चला आठवी व नववीचे निकाल लागताच  शाळेकडून आज विद्यार्थ्यांना पुस्तके विकत घेण्यासाठी सांगण्यात आले होते. शाळेच्या आवाराऐवजी आनंदवन चौक परिसरातील बघेले लॉन कॉम्प्लेक्सच्या आत हे तात्पुरते पुस्तक विक्रीचे ठिकाण ल...

सुंदर माझा गणपती घरगुती सजावट स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा**प्रवृत्ती फाउंडेशन सामाजिक संस्था चंद्रपूर द्वारे आयोजित सुंदर माझा गणपती

*सुंदर माझा गणपती घरगुती सजावट स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा*

अकूंश अवथे चंद्रपूर 

*प्रवृत्ती फाउंडेशन सामाजिक संस्था चंद्रपूर द्वारे आयोजित सुंदर माझा गणपती घरघुती गणपती सजावट स्पर्धा 2024* चे बक्षीस वितरण समारंभ आज दिनांक *07/10/2024 रोजी पत्रकार भवन वरोरा नका येथे पार पडला. संस्थेद्वारे ठरविलेल्या नियमावलीनुसार व ठरवलेल्या स्पर्धेच्या निकषानुसार प्रथम बक्षीस रुपये *अकरा हजार एकशे अकरा* "मानकरी मंगेश प्रभाकर अलोणे"मच्चीनाला पाल नगर मूल रोड चंद्रपूर
द्वितीय बक्षीस रुपये *पाच हजार एकशे अकरा* मानकरी शुभम जयप्रकाश नरवाडे आणि तृतीय पारितोषिक   *तीन हजार एकशे अकरा रुपये* मानकरी मानकरी "सुरज वसंतराव बिटे"क्रांती चौक बाबुपेठ चंद्रपूरव प्रत्येक नोंदणी करणाऱ्यांना स्पर्धाकांना उत्तेजनार्थ पुरस्कार व शिल्ड देऊन स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाला शेकडो गणेश भक्तांची उपस्तिती लावली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रउत्ती फाउंडेशन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आशिषजी माशीरकर, शिल्पा ताई कांबळे व संस्थेचे समस्त पदाधिकारी उपस्थित होते व कार्यक्रमाच्या यशस्वी करिता श्री मोनिद येरेवार,दिनेश इंगळे नियोजन ग्रुप व परीक्षकांचे संस्थेच्या अध्यक्ष आशिष माशिरकर यांच्या वतीने खूप खूप आभार मानण्यात आले.

*माननीय संपादक तसेच जिल्हा प्रतिनिधी आपल्या वर्तमानपत्र तसेच इलेक्ट्रॉनिक मीडिया न्यूज पोर्टल ला बातमी प्रकाशित करून सहकार्य करावे ही विनंती*🙏

Comments