प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाच्या तालुका अध्यक्षपदी शरद राजुरकर*

*महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाच्या तालुका अध्यक्षपदी शरद राजुरकर*

अतुल कोल्हे भद्रावती :-
              येथील लोकमान्य विद्यालयातील गणित शिक्षक शरद राजुरकर यांची महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाच्या भद्रावती तालुका अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली.
      त्यांच्या निवडीबद्दल लोकमान्य विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सचिन सरपटवार यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी उपप्राचार्य रुपचंद धारणे, पर्यवेक्षक प्रफुल्ल वटे आणि इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते. 
      राजुरकर यांचे लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार, सचिव नामदेवराव कोल्हे, सहसचिव अमित गुंडावार, शाळा समितीचे अध्यक्ष उल्हास भास्करवार, संचालक मनोहरराव पारधे, गोपालराव ठेंगणे, उमाकांत गुंडावार, अविनाश पाम्पट्टीवार, संजय पारधे यांनी अभिनंदन केले आहे.
      इतर कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष हरिश्चंद्र हरणे, सचिव कवीश्वर शेंडे, सहसचिव नितेश मिलमिले, कोषाध्यक्ष संजय जेऊरकर, प्रसिद्धी प्रमुख उमेश पाटील, सदस्य दयाकर मग्गीडवार, किरण उपासे, हरीहर येलकर, सुरेश सूर, अनिल कार्लेकर यांचा समावेश आहे.

Comments