वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

वरोरा येथे भव्य श्याम भजन संध्या संपन्न; भक्तीच्या रंगात रंगले भक्तगण. श्री खाटूश्याम बाबा यांचे मंदिर वरोरा शहर लवकरच उभारणार

वरोरा येथे भव्य श्याम भजन संध्या संपन्न; भक्तीच्या रंगात रंगले भक्तगण. 

श्री खाटूश्याम बाबा यांचे मंदिर वरोरा शहर लवकरच उभारणार
वरोरा/ चेतन लूतडे/२९/३/२६

 श्री खाटूश्याम बाबांच्या असीम कृपेने वरोरा नगरीत ‘भव्य श्याम भजन संध्या’ अत्यंत उत्साहात व भव्य दिव्य रोषणाईत, मंगलमय वातावरणात द्वारकाधीश लाॅन  येथे संपन्न झाली. या वेळी श्री खाटू श्यामजींच्या भक्तीने संपूर्ण परिसर भारावून गेला होता. प्रसिद्ध भजन गायक श्री. सागरजी व्यास (हैदराबाद) व निधी मंत्री नागपूर यांच्या सुमधुर आवाजातील भजनांनी भाविकांच्या मनाला एक वेगळीच शांती व प्रसन्नता दिली.
फुलांची वर्षा, अखंड ज्योत, अत्तराचा वर्षाव आणि बाबांचा अलौकिक दरबार पाहून भक्तीचा महासागर लोटल्याचा अनुभव वरोरा शहरातील भाविकांना आला. या मंगलमय सोहळ्याला उपस्थित राहण्याचे भाग्य वरोरा वाशीयांना लाभले, त्याबद्दल श्यामबाबांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. व वरोरा शहरात बाबाचे मंदिर बनविण्याचा मानस डॉक्टर सागर वजे यांनी व्यक्त केला आहे.

"करने वाला श्माम करन वाला श्माम" कार्यक्रमांमध्ये
 "हारे का सहारा बाबा श्माम हमारा.."  जयघोषात
"तीन बानके धारी..", "करो स्वागत बाबा का..","की जो केसरी के लाल", " मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है.." अशा सुमधुर भजनांनी भक्तिमय वातावरणात भक्तगण श्याम नृत्यात लीन झाले होते. यावेळी चिमूर येथील आमदार बंटी भांगडिया , बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे, माझी आमदार अविनाशजी वारजूरकर यांनी या भक्तीमय वातावरणामध्ये नृत्य करून आपला सहभाग दर्शविला.
या प्रसंगी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार आदरणीय बंटीभाऊ भांगडिया, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे,माजी आमदार डॉ. अविनाशजी वारजुकर, वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती जयंतभाऊ टेंभुर्डे, नगराध्यक्ष अर्चना ठाकरे, अमोलजी मूथ्था, राजूभाऊ उंबरकर, लक्ष्मणजी गमे, उपसभापती जयंत टेंमुर्डे यांच्यासह सामाजिक, राजकीय आणि विविध क्षेत्रातील मान्यवर व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वरोरा शहरात श्री श्याम भक्त मंडळ वरोरा यांच्या वतीने भव्य आयोजन करण्यात आले होते. यावेळी भक्तगणासाठी श्याम की रसोई अनोखा उपक्रम राबवून आयोजकांनी येणाऱ्या सर्व भक्तांना तृप्त केले. 
...............

Comments