वरोरा नगर परिषदेच्या सजावटीदार लाईट निविदा रद्द करण्याची मागणी; विरोधक आक्रमक

वरोरा नगर परिषदेच्या सजावटीदार लाईट निविदा रद्द करण्याची मागणी; विरोधक आक्रमक वरोरा: वरोरा नगर परिषदेने अंबादेवी मंदिर ते बशीर ऑईल मिलपर्यंत सजावटीदार स्ट्रीट लाईट बसविण्यासाठी काढलेल्या निविदेमुळे शहरातील राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. विरोधी गटातील नगरसेवकांनी ही निविदा रद्द करण्याची मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे केली असून, हा शासकीय निधीचा गैरवापर असल्याचा आरोप केला आहे. विरोधी गटाच्या नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात, प्रस्तावित मार्गावर सध्या असलेल्या स्ट्रीट लाईट पूर्णपणे सुस्थितीत असल्याचे म्हटले आहे. नगरसेवक कुरेकर यांनी नमूद केले की, जनतेकडून अशा कामाची कोणतीही मागणी नसताना नवीन सजावटीदार लाईट बसविणे म्हणजे प्रशासनाचा गैरकारभार आहे. विरोधकांनी केलेल्या मुख्य आक्षेपांपैकी एक म्हणजे दलित वस्ती प्रभागातील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. निवेदनात म्हटले आहे की, दलित वस्ती प्रभागात नाली बांधकाम, रस्ते, हँडपंप दुरुस्ती व शौचालये यासारख्या मूलभूत गरजा असताना केवळ दिसायला आकर्षक अशा सजावटीदार लाईटवर खर्च करणे संशयास्पद आहे. ...

*बिबट्याच्या हल्ल्यात एक वर्ष बालिका जखमी**आयुध निर्माणी वसाहतीतील घटना*

*बिबट्याच्या हल्ल्यात एक वर्ष बालिका जखमी*

*आयुध निर्माणी वसाहतीतील घटना*

आतील कोल्हे भद्रावती :-
              रात्रोच्या  वेळेस आपल्या वडिलासोबत अंगणात खेळत असलेल्या एका एक वर्ष बालिकेवर एका बिबट्याने अचानक हल्ला केला. त्यात ती बालिका जखमी झाली. तानीया निलेश वाकडे वय एक वर्ष, राहणार आयुध  निर्माणी  वसाहत. असे या जखमी बालिकेचे नाव आहे. सदर घटना दिनांक 14 ला रात्रो साडेनऊ वाजताच्या सुमारास  शहरातील निर्माणी वसाहतीत  घडली. सदर बालिकेला चंद्रपूर येथील एका दवाखान्यात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. आयुध  निर्माणीतील टाईप वन सेक्टर वन क्वार्टर नंबर 24 बी येथे राहणारे निलेश वाकडे हे रात्रोला आपल्या क्वार्टरच्या अंगणात बसले होते व जवळच त्यांची तानिया नावाची मुलगी खेळत होती. बाजूला दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक बालिकेवर हल्ला करून तिला जखमी केले. वडिलाने आरडाओरड केल्यानंतर बिबट्याने पळ काढला.सदर घटनेची माहिती प्राप्त झाल्यानंतर वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला. पुढील कार्यवाही  भद्रावती वनपरिक्षेत्र कार्यालयातर्फे सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वसाहतीत बिबट्याचा उपद्रव बंद होता. मात्र या घटनेमुळे वसाहतीत बिबटे पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.

Comments