चंद्रपूर जिल्ह्याला लाभलेल्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी वसुमना पंत .

चंद्रपूर जिल्ह्याला लाभलेल्या   पहिल्या महिला जिल्हाधिकारी  वसुमना पंत . बातमी: चेतन लूतडे २/४/२६ चंद्रपूर दि. २ – महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने जिल्हाधिकाऱ्यांच्या महत्त्वाच्या फेरबदल केले आहेत. चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. (भाप्रसे) यांची छत्रपती संभाजीनगर येथे नियुक्ती करण्यात आली आहे. ते विद्यमान जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या जागी राहणार असून, स्वामी यांना कनिष्ठ प्रशासकीय श्रेणीत अवनत करण्यात आले आहे. त्याचबरोबर, विनय गौडा यांच्या जागी चंद्रपूरच्या जिल्हाधिकारीपदी नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत (भाप्रसे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाच्या आदेशानुसार, विनय गौडा यांनी तातडीने छत्रपती संभाजीनगरचा कार्यभार दिलीप स्वामी यांच्याकडून स्वीकारावा, तर चंद्रपूरचा कार्यभार वसुमना पंत यांच्याकडे सोपवावा. बदली झाल्यानंतर कार्यभार हस्तांतरणाबाबतच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या आदेशाला सह सचिव सुभाष उमराणीकर यांनी मंजुरी दिली आहे. वसुमना पंत यांनी यापूर्वी विविध महत्त्वाच्या पदांवर काम क...

खांबाडा-नागरी रस्त्याने कोळसा वाहतूक करणारे ओव्हरलोड वाहतुक बंद करावी. शिवसेना तालुकाप्रमुख दत्ता बोरेकर

खांबाडा-नागरी रस्त्याने कोळसा वाहतूक करणारे  ओव्हरलोड वाहतुक बंद करावी. 
शिवसेना तालुकाप्रमुख दत्ता बोरेकर

वरोरा 
चेतन लुतडे 

वरोरा तालुक्यातील ओम साई कंपनी, उखर्डा या कंपनीला कोळसा पुरवठा करणारी वंदना ट्रान्सपोर्टची ओव्हरलोड वाहतुक उखर्डा-नागरी-खांबाडा या मार्गाने होत असुन कोळशाने ओव्हरलोड भरलेले ट्रक या मार्गावरुन धावत आहे. सदर रस्त्याची वाहतुक क्षमतेविषयी सार्वजनिक बांधकाम विभाग, वरोरा यांच्याकडुन माहिती घेतली असता सदर रस्ता हा IRC (Indian Road Congress)-37 च्या मार्गदर्शक सुचनेनुसार Standard Axle Load (Single Axle with Dual Wheel) नुसार 8 मेट्रीक टन इतक्या क्षमतेच्या वाहतुकीकरीता डीजाईन करण्यात आल्याचे कळते. परंतु सदर ट्रकांमध्ये 30 ते 40 मेट्रीक टन एवढा कोळसा भरुन वाहतुक होत असल्यामुळे या मार्गावर जागोजागी खड्डे पडलेले आहे. हा रस्ता अत्यंत खराब होत असुन या यामुळे सामान्य नागरीकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुकाप्रमुख दत्ता बोरेकर यांच्याकडे ग्रामस्थांची तक्रार प्राप्त झाली होती. 

या अनुषंगाने  सदर रस्त्यावरुन होणारी वाहतुक ताबडतोब बंद करावी जेनेकरुन सामान्य नागरीकांना त्रास सहन करावा लागणार नाही, सदर बाब हि अत्यंत गंभीर असुन यावर तात्काळ कार्यवाही करणे अपेक्षीत आहे. करीता सदर विषयाची तात्काळ कार्यवाही करण्या बाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्याकडे देण्यात आले आहे.

Comments