अतुल कोल्हे भद्रावती :-
जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत येथील लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचा १९ वर्षाखालील मुलींचा क्रिकेट संघ विजयी ठरला असून तो आता विभागस्तरीय स्पर्धेमध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये लोकमान्य तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाने सिंदेवाही तालुका संघावर विजय मिळवीत विभागीय स्पर्धेकरिता आपले स्थान पक्के केले आहे. १९ वर्षाखालील मुलींच्या या विजयी संघामध्ये अवंतिका नागोसे, श्रृती मुंडरे, श्रावणी बोंम्मावार, यशस्वी आस्वले, भावना आडेकर, प्रिया ढेंगळे, नव्या मानकर,तन्वी खुटेमाटे, उमादेवी आस्वले, जान्हवी बोरीकर, अमोली गेडाम, रिया देवगडे या खेळाडूंचा सहभाग होता.
विजयी संघाचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांतजी गुंडावार,प्राचार्य सचिन सरपटवार, उपप्राचार्य रूपचंद धारणे, पर्यवेक्षक प्रफुल वटे, क्रीडा वि.प्रमुख विशाल गावंडे, आशिष आकोजवार ,प्रिया भास्करवार, रोशन पारखी व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.
Comments
Post a Comment