वरोरा येथे भव्य श्याम भजन संध्या संपन्न; भक्तीच्या रंगात रंगले भक्तगण. श्री खाटूश्याम बाबा यांचे मंदिर वरोरा शहर लवकरच उभारणार

वरोरा येथे भव्य श्याम भजन संध्या संपन्न; भक्तीच्या रंगात रंगले भक्तगण.  श्री खाटूश्याम बाबा यांचे मंदिर वरोरा शहर लवकरच उभारणार वरोरा/ चेतन लूतडे/२९/३/२६  श्री खाटूश्याम बाबांच्या असीम कृपेने वरोरा नगरीत ‘भव्य श्याम भजन संध्या’ अत्यंत उत्साहात व भव्य दिव्य रोषणाईत, मंगलमय वातावरणात द्वारकाधीश लाॅन  येथे संपन्न झाली. या वेळी श्री खाटू श्यामजींच्या भक्तीने संपूर्ण परिसर भारावून गेला होता. प्रसिद्ध भजन गायक श्री. सागरजी व्यास (हैदराबाद) व निधी मंत्री नागपूर यांच्या सुमधुर आवाजातील भजनांनी भाविकांच्या मनाला एक वेगळीच शांती व प्रसन्नता दिली. फुलांची वर्षा, अखंड ज्योत, अत्तराचा वर्षाव आणि बाबांचा अलौकिक दरबार पाहून भक्तीचा महासागर लोटल्याचा अनुभव वरोरा शहरातील भाविकांना आला. या मंगलमय सोहळ्याला उपस्थित राहण्याचे भाग्य वरोरा वाशीयांना लाभले, त्याबद्दल श्यामबाबांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. व वरोरा शहरात बाबाचे मंदिर बनविण्याचा मानस डॉक्टर सागर वजे यांनी व्यक्त केला आहे. "करने वाला श्माम करन वाला श्माम" कार्यक्रमांमध्ये ...

ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण #रतन_टाटा यांना आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण #रतन_टाटा यांना आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

फक्त बातमी 

मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे  यांनी बैठकीत शोकप्रस्ताव मांडला आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. रतन टाटा यांना #भारतरत्न देण्याची विनंती केंद्र सरकारला करण्याचा प्रस्ताव यावेळी संमत करण्यात आला.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शोकप्रस्तावात म्हटले की, उद्यमशीलता समाज उभारणीचा प्रभावी मार्ग आहे. नवनवीन उद्योगांची उभारणी देशाला प्रगतीपथावर नेऊ शकते, परंतु त्यासाठी निस्सीम देशप्रेम आणि समाजाप्रती प्रामाणिक कळवळा आवश्यक आहे. रतन टाटा यांनी या गुणांचा आदर्श घालून दिला. उद्योगक्षेत्रातच नव्हे, तर समाजउभारणीच्या कामातही त्यांचे योगदान अपूर्व होते. ते महाराष्ट्राचे सुपुत्र आणि भारताचा अभिमान होते. रतन टाटा यांनी उच्च नैतिक मूल्यांचे पालन करत आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा ठसा उमटवला. त्यांच्या निधनाने देशाचा एक प्रमुख आधारस्तंभ कोसळला आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शोकप्रस्तावात म्हटले आहे.

Comments