खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार: पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला

खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार  पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला बातमी: वरोरा 16/4/26 वरोरा : १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीच्या उत्सवी वातावरणात आंबेडकर चौक, वरोरा येथे अचानक आग लागल्याची घटना घडली. या गंभीर प्रसंगी सहाय्यक  पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांनी विलक्षण तत्परता आणि धाडस दाखवत स्वतः पुढाकार घेत, आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. त्यांच्या या वेगवान व धैर्यशील कृतीमुळे मोठा अनर्थ टळला. या पराक्रमाची दखल घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, वरोरा तर्फे पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुष्पगुच्छ, शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. शरद भस्मे यांच्या कार्यामुळे ‘खाकी’ वर्दीवरील विश्वास अधिक दृढ झाला असून, त्यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. संकटसमयी दाखवलेली त्यांची जबाबदारी, तत्परता आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी ही इतरांसाठी प्रेरणादायी ठरते. “संकटाच्या वेळी धावून येणारी खाकीच खरी जनतेची ताकद आहे,” याचे उत्तम उदाहरण म्हणजे शरद भस्मे य...

महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रवीण काकडे यांचे शक्ती प्रदर्शन.

महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रवीण काकडे यांचे शक्ती प्रदर्शन. 

वरोरा 
चेतन लुतडे 

राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मा. प्रवीण भाऊ काकडे यांनी प्रचंड मोठ्या जनसागराच्या आशीर्वादाने आणि महाविकास आघाडीतील समस्त घटक पक्षांच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपले नामांकन उपविभागीय  अधिकारी कार्यालय , वरोरा येथे दाखल केले.


 यावेळी मा. प्रतिभाताई धानोरकर, खासदार चंद्रपूर वणी- अर्णी लोकसभा क्षेत्र, मा. विनोदजी दत्तात्रेय , महासचिव चंद्रपूर राष्ट्रीय काँग्रेस क्षेत्र यांच्यासह राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांचे पदाधिकारी , कार्यकर्ते व प्रचंड मोठा जनसमुदाय या सोहळ्याचा साक्षीदार बनला. यावेळी मा. प्रवीण भाऊ काकडे यांना वरोरा भद्रावती विधानसभा मतदार संघातून प्रचंड मोठ्या बहुमताने एकजुटीने विजयी करू हा निर्धार सर्वांनी स्पष्टपणे मांडला व याच विश्वासाच्या जोरावर व स्वर्गीय बाळूभाऊ धानोरकर त्यांच्या आशीर्वादाने महाविजयी होण्याचा स्पष्ट निर्धार मा. प्रवीण भाऊ काकडे यांनी व्यक्त केला.

Comments