मासळ येथील पोलीस पाटलावर अवैध दारू विक्रेत्यांनी केला हल्ला : आरोपी अटकेत**आरोपीवर कठोर कारवाई करा : पोलीस पाटील संघाचे ठाणेदाराला निवेदन*
*आरोपीवर कठोर कारवाई करा : पोलीस पाटील संघाचे ठाणेदाराला निवेदन*
अतुल कोल्हे भद्रावती -
तालुक्यातील मासळ ( विसापूर ) येथील अवैध दारू विक्रेत्यांनी येथील पोलीस पाटलाला तू आमची दारू पकडणारा कोण होय असे म्हणत दोघांनी त्याच्यावर हल्ला चढवत लाता बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याचा प्रकार दिनांक ८ रोज मंगळवार ला घडला फिर्यादीच्या तक्रारीवरून भद्रावती पोलिसांनी अवैध दारू सह दोन आरोपीला अटक केली आहे .
हनुमान बबन हंसकार व प्रमोद रामचंद्र बावणे राहणार मासळ ( विसापूर ) तालुका भद्रावती असे आरोपीचे नाव आहे तर फिर्यादी मारुती नारायण मशारकर वय ( ५१ ) वर्ष असे या पोलीस पाटलाचे नाव आहे मशारकर हे २०१७ पासून मासळ या गावात पोलीस पाटील या पदावर कार्यरत आहे दिनांक १५ ऑगस्ट २०२४ पासून मासळ येथे तंटामुक्ती समितीतर्फे दारूबंदी केल्या बाबत ठरवा घेऊन याबाबत गावकऱ्यांना सूचना करण्यात आल्या तेव्हापासून गावात दारू विक्री बंद झाली. गेल्या दोन चार दिवसापासून वरील आरोपी पुन्हा गावात दारू आणून विक्री करत होते. याकरता तंटामुक्ती अध्यक्ष अविनाश महाजन , पोलीस पाटील मारुती मशारकर यांनी प्रत्यक्ष घरी जाऊन त्यांना समज दिली त्यानंतर पुन्हा गावात दारू विक्री करणार नसल्याचे त्यांनी कबूल केल. दिनांक ८ ऑक्टोबरला हनुमान हंसकार व प्रमोद बावणे हे दुचाकी क्रमांक ३४ बी क्यू ६६ ८८ ने देशी दारू आणत असल्याबाबतची माहिती मिळाली त्याची दुचाकी तपासली असता त्याच्या डीक्कीतून ४५ बाटला देशी दारू निघाली या प्रकारामुळे अवैध दारू विक्रेते भडकले व दोघांनीही तू दारू पकडणारा कोण होत असे म्हणत लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले आरोपीवर १३२ , १२१ , ३५१ , ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे पुढील तपास ठाणेदार अमोल काचोरे करीत आहे.
[आरोपीवर कठोर कारवाई करा ]
गावातील पोलीस पाटील हे आपलं कर्तव्य बजावत असताना त्याच्यावर प्राण घातक हल्ला करून जखमी केले . या अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी या मागणीसाठी गाव कामगार पोलीस पाटील संघाचे जिल्हाध्यक्ष योगेश मते यांच्या नेतुत्वात संतोष बागेसर , देऊबा परसे , संतोष बलकी , सपना कातकर , सुषमा रामटेके, सुनिता पाटील सह पोलीस पाटील संघाचे सदस्यांनी ठाणेदार यांना निवेदन दिल.
Comments
Post a Comment