टेमुर्डा ग्रामपंचायतीच्या बकरी बाजार व आठवडी बाजाराचा 20 मार्च रोजी लिलाव.

टेमुर्डा ग्रामपंचायतीच्या बकरी बाजार व आठवडी बाजाराचा 20 मार्च रोजी लिलाव. टेमुर्डा : येथील ग्रामपंचायत हद्दीतील बकरी बाजार व आठवडी बाजार (भाजीपाला व इतर) यांच्या आगामी २०२६-२७ या वर्षासाठी जाहीर लिलावाची प्रक्रिया पार पडणार आहे. हा लिलाव मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम १२६ अन्वये ग्रामपंचायत सभागृह, टेमुर्डा येथे दिनांक 20 मार्च २०२६, शुक्रवार रोजी सकाळी ११.०० वाजता होणार आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सन २०२६-२०२७ (दि. १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०२७) या कालावधीसाठी हे बाजार ठेक्याने देण्यात येणार आहेत. लिलाव प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या इच्छुक ठेकेदारांना काही महत्त्वाच्या अटी व शर्ती पूर्ण कराव्या लागणार आहेत. लिलाव प्रक्रिया व अनामत रक्कम : लिलावाच्या दिवशी सकाळी ११.०० ते ११.३० या वेळेत इच्छुक बोलीदारांची अनामत रक्कम स्वीकारली जाईल. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता प्रथम बकरी बाजाराच्या लिलावास सुरुवात होईल. बकरी बाजार लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आठवडी बाजार (भाजीपाला व इतर) यासाठी लिलाव घेण्यात येईल. लिलावात सहभागी होण्यासाठी बकर...

कृऊबाच्या नंदोरी उपबाजारात सोयाबीन व कापूस खरेदीला सुरुवात

*कृऊबाच्या नंदोरी उपबाजारात सोयाबीन व कापूस खरेदीला सुरुवा*

अतुल कोल्हे भद्रावती :-
           कृषी उत्पन्न बाजार समिती भद्रावती अंतर्गत येत असलेल्या नंदोरी येथील आदिती कॉटन इंडस्ट्रीज उपबाजारात दिनांक 26 पासून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भास्कर ताजणे यांच्या हस्ते सोयाबीन व कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली. पहिल्याच दिवशी 363 क्विंटल सोयाबीन व 101 क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. याप्रसंगी सभापती भास्कर ताजने, उपसभापती आश्लेषा भोयर, संचालक गजानन उताणे, मनोहर आगलावे, कानोबा तिखट, प्रवीण बांदुरकर, राजेंद्र डोंगे, सचिव नागेश पुनवटकर, आदिती कॉटन इंडस्ट्रीजचे संचालक अविष बाहे, नंदोरी  ग्रामपंचायतचे सरपंच मंगेश भोयर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पहिल्या दिवशी कापूस व सोयाबीन विक्रीसाठी आलेले शेतकरी सुरेश काळे, शत्रुघ्न पिदुरकर, रवींद्र विधाते, संदीप ढेंगळे, मंगेश विरुटकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाजार समितीचे कर्मचारी संजय शेंडे, प्रवीण राहुलगडे, विलास पालकर, अरुण पाठक यांनी सहकार्य केले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपला शेतमाल नंदोरी आवारात विक्रीसाठी आणावा असे आवाहन सभापती भास्कर ताजणे, उपसभापती आश्लेषा  भोयर व सचिव नागेश पुनवटकर यांनी यावेळी केले.

Comments