काँग्रेसच्या विधानसभा इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीला सुरुवात. आमदार अभिजीत वंजारी यांच्याकडे जबाबदारी
आमदार अभिजीत वंजारी यांच्याकडे जबाबदारी
वरोरा
चेतन लुतडे
येत्या काही दिवसात विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या निवडणुकीची तयारी म्हणून काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती मंगळवार 1 ते 8 ऑक्टोम्बर पर्यंत घेणार असून त्यांनतर मुलाखतीचा गोपनीय अहवाल 10 ऑक्टोम्बर ला प्रदेश कार्यालयाकडे सादर करणार आहे.
चंद्रपूर, बल्लारपूर, ब्रह्मपुरी, वरोरा, राजुरा व चिमूर विधानसभा क्षेत्रातून अनेक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. काँग्रेस पक्षाचे आमदार अभिजीत वंजारी यांच्याकडे चंद्रपूर व गडचिरोली येथील इच्छुक उमेदवारच्या मुलाखती घेण्याची जबाबदारी सोपवली आहे. हा अहवाल 10 ऑक्टोबर पर्यंत प्रदेश काँग्रेस कमिटीला सोपवण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सहा जागापैकी दोन जागा इतर पक्षासाठी सुटेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
वरोरा भद्रावती विधानसभेमध्ये काँग्रेस आमदार प्रतिभाताई धानोरकर नुकत्याच लोकसभेच्या निवडणूक जिंकून खासदार झालेल्या आहेत त्यामुळे काँग्रेसच्या या जागेवरती बऱ्याच इच्छुक उमेदवारांची भाऊ गर्दी झाली आहे.
राजू चिकटे, प्रवीण काकडे, अनिल धानोरकर, हेमंत खापणे ,डॉक्टर चेतन खुटेमाटे यासह अनेक नेत्यांनी काँग्रेस पक्षाचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
श्री प्रवीण काकडे
Comments
Post a Comment