75 वरोरा भद्रावती विधानसभेमध्ये भाजपा पक्षातर्फे करण देवतळे यांची उमेदवारी जाहीर युवा कार्यकर्त्यांचा घरासमोर जल्लोष

75 वरोरा भद्रावती विधानसभेमध्ये भाजपा पक्षातर्फे करण देवतळे यांची उमेदवारी जाहीर 

युवा कार्यकर्त्यांचा घरासमोर जल्लोष 

वरोरा 
चेतन लुतडे 

भारतीय युवा मोर्चामध्ये सक्रिय कार्यकर्ते युवा नेते संजय करण देवतळे यांची भाजपा पक्षातर्फे वरोरा भद्रावती विधानसभेमध्ये  उमेदवारी जाहीर झाली असून पक्षातील ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या आशीर्वादाने उत्तम कार्य करण्याचे आश्वासन जनतेला दिले आहे.
महायुतीतील सर्व पक्षांचे व वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले असून  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सबका साथ सबका विकास  हा नारा देत जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या भागातील जो विकास थांबला आहे. युवकांचे प्रश्न, शेतकऱ्यांची पांदन रस्ते, बेरोजगारी या प्रश्नावर प्रभावी काम करण्याचे आश्वासन करण देवतळे यांनी दिले आहे.  पक्षाने जी जबाबदारी दिलेली आहे त्यानुसार कार्य करणार असून जनतेचे विकासात्मक प्रश्न विधानभवनात लावून धरेल. असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. 

त्यांच्या राहत्या घरी माझी मंत्री हंसराज अहिर यांनी भेट देत  पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजप  पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत शुभेच्छा व्यक्त केल्या.

Comments