स्वच्छतेचा संदेश: नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी उचलली कचरामुक्तीची मोहीम

स्वच्छतेचा संदेश: नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी उचलली कचरामुक्तीची मोहीम वरोरा, दि. १८ मार्च – 'स्वच्छ महाराष्ट्र अभियान २०२५-२६' अंतर्गत वरोरा नगर परिषदेच्या वतीने आयोजित विशेष स्वच्छता मोहिमेत नगराध्यक्ष अर्चना ठाकरे आणि नगरसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन नागरिकांना स्वच्छतेचा संदेश दिला. बुधवारी सकाळी ८ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि तलाव परिसरात या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगराध्यक्ष श्रीमती ठाकरे यांच्यासह नगरसेवकांनी हातात झाडू घेऊन परिसरातील कचरा साफ केला. विशेषतः शहराच्या मध्यभागी असलेले गांधी योग उद्यान आणि आजूबाजूच्या भागात स्वच्छता करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष अर्चना ठाकरे यांनी नागरिकांशी संवाद साधताना सांगितले की, "आपल्या शहराला सुंदर आणि आरोग्यदायी बनवणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. केवळ प्रशासनच नाही, तर जेव्हा नागरिक आणि लोकप्रतिनिधी एकत्र येतात, तेव्हाच खऱ्या अर्थाने शहराचा कायापालट होतो." स्वच्छता राखण्याची जबाबदारी नगरपालिकेवर जशी आहे तशीच येथील जनतेवर सुद्धा आहे त्यामुळे घरापुढील कचरा साफ ठेवण्य...

*श्री साई कॉन्व्हेंटच्या रोनक देरकर ची कॅरम स्पर्धेत विभागीय स्तरावर निवड*

*श्री साई कॉन्व्हेंटच्या रोनक देरकर ची कॅरम स्पर्धेत विभागीय स्तरावर निवड*

अतुल कोल्हे भद्रावती :-
               क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा परिषद व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय व्दारा आयोजित जिल्हा स्तरिय कॅरम स्पर्धेत स्थानिक श्री साई कॉन्व्हेंट च्या खेळाडूची विभागीय  स्तरावर निवड झाली आहे. 
              चंद्रपुर येथील क्रिडा संकुलन येथे नुकत्याच झालेल्या जिल्हा स्तरीय कॅरम स्पर्धेत१४ वर्षों आतील मुलांच्या संघात कॅरम स्पर्धेत वर्ग ८ चा  खेळाडू  रोनक देरकर यांची विभागीय स्तरावर कॅरम स्पर्धे करिता निवड झाली आहे. सदर स्पर्धा २६ सप्टेंबर रोजी भंडारा येथील जिल्हा क्रिडा संकुलन येथे होणार आहे. खेळाडू ने आपल्या यशाचे श्रेय मुख्याध्यापिका कु. किरण कोथळे , क्रीडा शिक्षक सुनील दैदावार,वर्ग शिक्षिका,आई आणि वडील यांना दिले आहे. संस्थेचे सचिव प्रा.अतुल गुंडावार, रूपा गुंडावार यांनी खेळाडू चे अभिनंदन केले व पुढील खेळा करिता शुभेच्छा दिल्या.




Comments