नागरिकांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधणारे निवेदन; दिव्यांग नागरिकांचे ५% निधी थकविल्याने आंदोलनाचा इशारा; नगर परिषदेला निवेदन सादर

नागरिकांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधणारे निवेदन;  दिव्यांग नागरिकांचे ५% निधी थकविल्याने आंदोलनाचा इशारा; नगर परिषदेला निवेदन सादर   वरोरा, दि. १८ मार्च – शहरातील मूलभूत सुविधांच्या प्रश्नांसह दिव्यांग नागरिकांचा ५ टक्के निधी थकविल्याप्रकरणी जिल्हा शांतता समिती सदस्य शेख जैरुदीन (छोटूभाई) यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नगराध्यक्ष अर्चना आशिष ठाकरे यांना निवेदन सादर करून मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. नगर परिषद कार्यालयात आयोजित बैठकीत शेख जैरुदीन यांनी सांगितले की, शहरातील हजारो नागरिक कर भरूनही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.   दरवर्षी ५० ते ६० लाख रुपये उपभोक्ता कर भरूनही दर दोन दिवसांनी घंटागाडी येत असल्याने घरात कचरा साचतो. दररोज घंटागाडी पाठवावी अन्यथा कर अर्धा करावा.  अनेक महिन्यांपासून फवारणी न झाल्याने मच्छर व विषारी जंतूंचा प्रादुर्भाव वाढला आहे. महिन्यातून दोन वेळा फवारणी करण्याची मागणी केली आहे. शहरात मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांनी अनेक नागरिकांना चावा घेतला असून त्वरित  कारवाई करावी. उन्हाळ...

*शिवसेना उबाठा गटाचा भद्रावतीत भव्य मेळावा**आमदार भास्कर जाधव यांची उपस्थिती**जनसंपर्क कार्यालयाचेही होणार उद्घाटन*

*शिवसेना उबाठा गटाचा भद्रावतीत भव्य मेळावा*

*आमदार भास्कर जाधव यांची उपस्थिती*

*जनसंपर्क कार्यालयाचेही होणार उद्घाटन*

अतुल कोल्हे भद्रावती :-
                 वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघ ७५ च्या शिवसेनेच्या उबाठा गटातर्फे उद्या दि.२७ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता भद्रावती येथील मुर्लीधर पाटील गुंडावार मंगल कार्यालयात वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील विधानसभा सहकाऱ्यांचा भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 
      सदर मेळाव्याला शिवसेना उबाठा गटाचे आमदार तथा पूर्व विदर्भ संपर्क नेते भास्कर जाधव मार्गदर्शन करणार आहेत. तसेच त्यांच्यासोबत विदर्भ समन्वयक प्रकाश वाघ, सुरेश साखरे, जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत कदम, विधानसभा संपर्कप्रमुख रितेश रहाटे उपस्थित राहणार आहे. मेळाव्यापूर्वी त्यांच्या शुभ हस्ते येथील गांधी चौकातील शिवसेना (उबाठा) विधानसभा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटनही करण्यात येणार आहे. जाधव यांचे एतेहासिक भद्रावती नगरीत आगमन होण्यापूर्वी ते वरोरा तालुक्यातील खांबाडा येथे सकाळी ११ वाजता उपस्थित राहुन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर टेमुर्डा, आनंदवन चौक, रत्नमाला चौक आणि नंदोरी येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे.
      या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना (उबाठा गट) जिल्हा प्रमुख तथा वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख मुकेश जीवतोडे यांनी केले आहे.

Comments