*चंद्रपूर जिल्हा कुस्तीगीर संघ कार्यकारिणीच्या निवड प्रक्रियेत वरोरा तालुकाध्यक्ष पदी चेतन शर्मा यांची निवड*
*चंद्रपूर जिल्हा कुस्तीगीर संघ कार्यकारिणीच्या निवड प्रक्रियेत वरोरा तालुकाध्यक्ष पदी चेतन शर्मा यांची निवड*
फक्त बातमी
वरोरा (प्रती) वरोरा येथील सोना- चांदीचे व्यावसाईक तसेच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव चेतन चंदनलाल शर्मा यांची चंद्रपूर जिल्हा कुस्तीगर संघाच्या कार्यकारीणी निवड प्रक्रियेत वरोरा तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली
दिनांक २२/०९/२०२४ ला सियोन वृध्दाश्रम आरवट ,चंद्रपूर च्या सभागृहात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे निवडणुक निरीक्षक अनिलजी पांडे यवतमाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत चेतन शर्मा यांची निवड करण्यात आली. तसेच नव्याने जिल्हा कार्यकारिणीची ही निवड करण्यात आली असुन यावेळी नव्याने निवड झालेले पदाधिकारी कार्याध्यक्ष-प्रशांत दानव
अध्यक्ष-शरद टेकुलवार
उपाध्यक्ष-राजेश सोलापन
उपाध्यक्ष-चंद्रशेखर पडगेलवार
सचिव- छगन पडगेलवार
सहसचिव सुभाष -लांजेकर
कोषाध्यक्ष -मुरलीधर टेकुलवार
सदस्य-प्रदिप रोगे ,गजानन क्षीरसागर ,धरमपाल पवार ,सुनिल सिरसाट ,अमर टेकुलवार शुभम अंबिरवार, माधव डोईफोडे व उदय अंबिरवार हे उपस्थित होते. चंद्रपूर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या निवड प्रक्रियेमध्ये इतरही तालुकास्तरावर पदाधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा केली असून वरोरा तालुक्याची धुरा चेतन शर्मा यांच्याकडे सोपविण्यात आली आहे ,वरोरा शहरात काही दिवसातच कुस्तीचे सामने रंगणार असल्याची ही घोषणा सभेत करण्यात आली यावेळी चंद्रपूर जिल्ह्यातील इतरही तालुक्यातील अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
Comments
Post a Comment