*रोटरी क्लब वरोरा* , आर्ट ऑफ लिविंग, आनंद निकेतन कॉलेज तर्फे *हॅलो डायबिटीज -मधुमेह शिक्षण* सत्र आनंदवन मध्ये संपन्न

*रोटरी क्लब वरोरा* , आर्ट ऑफ लिविंग, आनंद निकेतन कॉलेज तर्फे *हॅलो डायबिटीज -मधुमेह शिक्षण* सत्र आनंदवन मध्ये संपन्न 

 *गिनीस बुक ऑफ रेकार्ड मध्ये नोंद झालेले डॉ. सुनील गुप्ता यांचे मधुमेहा वर मोलाचे मार्गदर्शन. 

वरोरा 
     मधुमेह शिक्षण सत्राचे आयोजन 8 सप्टेंबर 2024 ला आनंदवनातील सांस्कृतिक सभागृहामध्ये करण्यात आले होते.
    कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते नागपूरचे सुप्रसिद्ध डॉ. सुनील गुप्ता हे होते. तर मुख्य अतिथी महारोगी सेवा समिती आनंदवन चे सचिव, जेष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे व भारतीताई आमटे हे होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ. विजय चांडक, प्राचार्य डॉ. मृणाल काळे,रोटरी क्लब चे अध्यक्ष बंडूभाऊ देऊळकर ,सचिव अभिजीत मणियार आदींची उपस्थिती होती.
    मधुमेह शिक्षण सत्रामध्ये डायबिटीज आजारावर मार्गदर्शन करताना सुनील गुप्ता म्हणाले की वयाचे 30 चे वर आपली शुगर तपासली पाहिजे. देशात 10.1 करोड लोकांना शुगर आहे. आणि 13.6 करोड लोकांना फ्री शुगर आहे. 18 चे वर युवकांना शुगर आहे किंवा फ्री शुगर आहे त्यांनी औषधे सुरु करावी. इन्शुलन्स घेणे आवश्यक आहे. पोटामध्ये ग्रंथी असतात त्याला स्वादुपिंड म्हणतात. त्यामध्ये इन्शुलन्स असते. त्यामध्ये हार्मोन्स तयार होत असते. आपण डाळ, भात, पोळी, भाजी जेवन केल्यानंतर ग्लुकोज तयार होत असते. त्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळतात परंतु इन्शुलन्स ची काम करण्याची क्षमता कमी होऊन जाते. सिमला, लवंगी मिर्ची आहे यामध्ये लवंगी मिरची मुळे इन्शुलन्स ची कार्यक्षमता वाढतात. तसेच शुगर कमी करायची असेल तर व्यायाम करणे खूप आवश्यक आहे. 150 ते 300 मिनिट वेळ मिळाला नाही तर आठवड्यात 40 मिनिट व्यायाम करावा. शुगर कमी होतात. असे डॉ. सुनिल गुप्तानी मधुमेह आजारावर मौलिक मार्गदर्शन केले.
   जेष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे यांनी आपले शुगर आजारावर आपले विचार प्रगट करताना म्हणाले की मला डायबिटीज होणार नाही असे मला वाटतं होते. मी दररोज 16 मिरची खात होतो. परंतु अचानक डायबिटीज चा त्रास सुरु झाला.महारोगी सेवा समिती आनंदवन  या संस्थेने 11 लाख कृष्ठारोगी बरे केले.या रोगानी कोणीही मरत नाही. म्हणून पुढच्या जन्मी मला महारोग पाहिजे असे मला वाटत होते. डायबेटीस चे औषध मी डॉ. गुप्ता कडून घेतो आहे. आज सवाकोटी कृष्ठारोगी देशात आहे. सर्वांना जेलमध्ये टाकले तर सर्व जेल संपावर जाईल.त्यांच्या जखमाना कोणीही हात लावत नाही. डायबेटीस वर खूप मोठे संशोधन सुरु आहे. डॉ. गुप्ता यांनी लोकांना डायबिटीज पासून मुक्त करावे. डॉ. गुप्ता आणि डॉ. चांडक यांचा सल्ला घेऊन उपचार करून डायबिटीज वर मात करा असे उपस्थित लोकांना आवाहन करून मौलिक विचार विषद केले.
    डॉ. विजय चांडक यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.
संचालन रोटेरियन अमित लाहोटी यांनी केले. तथा रोटेरियन हिरालाल बघेले, ओमभाऊ मांडवकर,डॉ विवेक तेला, दामोदर भासपाले, प्रवीण किटे, मनोज जोगी, विजय पावडे, रवी शिंदे, देवानंद गावंडे,मधुकर फुलझेले,आर्ट ऑफ लिविंग  सदस्य , माहेश्वरी समाज सदस्य, यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमस्थळी उपस्थित शेकडो लोकांची शुगर थायरॉईड सुद्धा चेक करण्यात आली.

Comments