*दागिने व रोख रकमेसह २ लाख १० हजाराचा मुद्देमाल चोरी*
अतुल कोल्हे भद्रावती :-
शहरातील गोविंद ले -आउट येथे राहते घरी अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सोने-चांदी व रोख रकमेसह २ लाख १० हजाराचा मुद्देमाल चोरून नेला ही घटना दिनांक २७ च्या मध्यरात्री घडली.
अविनाश ठवकर ही आपल्या मुलासह गोविंद ले -आउट येथे राहते ती दिनांक २६ रोज गुरुवारला मुलीकडे जेवण करण्याकरता गेली त्यानंतर रात्रोला तिथेच थांबली आज २७ रोज गुरुवारला पहाटे घरी आली असता घरासमोरील लोखंडी गेट व दरवाज्यातील कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसले त्यानंतर घरातील कपाट उघडे दिसले त्यातील सोन्या - चांदीचे दागिने किंमत १ लाख ४५ हजार व रोख रक्कम ६५ हजार असा एकूण २ लाख १० हजाराचा मुद्देमाल चोरीस गेला या घटनेची तक्रार भद्रावती पोलिसात दाखल करण्यात आली असून पोलीस अज्ञात चोट्यांचा शोध घेत आहे पुढील तपास ठाणेदार बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
Comments
Post a Comment