वरोरा येथे जश्ने ईद मिलादुन्नबी सेंट्रल कमेटी द्वारे महाप्रसादाचे आयोजनगंगा-जमुना तहजीबाची उदाहरण पाहण्यास मिळाली
गंगा-जमुना तहजीबाची उदाहरण पाहण्यास मिळाली
फक्त बातमी
वरोरा: शहरात भाईचाऱ्याचा संदेश देणाऱ्या ईद ए- मिलाद- उन- नबी सणानिमित्त, सोमवार रोजी सौहार्दपूर्ण वातावरणात मोठ्या धूमधामाने साजरा केल्यानंतर, जश्ने ईद मिलादुन्नबी सेंट्रल कमेटी, वरोरा तालुक्याने शनिवारी कामगार चौक, जनता बेकरी स्थित परिसरात महाप्रसादाचा सार्वजनिक वितरण कार्यक्रम आयोजित केला.
कार्यक्रमात महाप्रसादासाठी हजारो लोकांची गर्दी झाली. सर्व महानुभावांना मेजवर बसवून महाप्रसाद वितरित करण्यात आला, तसेच जिलबी देऊन मिठाईचा आनंद घेतला. या कार्यक्रमात गंगा-जमुना तहजीबाची उत्कृष्ट उदाहरणे पाहायला मिळाली, याबद्दल शहरात चर्चा चालली आहे. ईद मिलादुन्नबीच्या निमित्ताने शहरातील विविध राजकीय संघटना व सामाजिक संस्था चौकात पंडाल लाऊन जुलूसाचे स्वागत केले होत्या. सर्वांना महाप्रसाद वितरण कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आले.
महाप्रसाद वितरण कार्यक्रमात शहर तसेच ग्रामीण क्षेत्रातील सुमारे ३ हजार लोकांनी सहभाग घेतला. शहरातील गणमान्य व्यक्तींनी महाप्रसादाचा आनंद घेतला. कार्यक्रमात भाजपा चे करन देवतले, अहेतेशाम अली, डॉ. सागर वझे, काँग्रेस पार्टीचे प्रवीण काकडे, विलास टिपले, राहुल देवडे, उबाठा शिवसेनेचे मुकेश जीवतोडे, रोटरी क्लब अध्यक्ष बंडू देऊलकर, जय हिंद सैनिक संस्थेचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष राजेंद्र मर्दाने, सहाय्यक पोलिस निरीक्षक शरद भस्मे, पत्रकार बालू भोयर, मनोज श्रीवास्तव, चेतन लुतडे, प्रदीप कोहपरे, प्रवीण गंधारे, खेमचंद नेरकर, विनोद शर्मा, हरीश केशवाणी, सामाजिक कार्यकर्ता शकील पटेल, अधि. जयंत ठाकरे, सनी गुप्ता इत्यादींना पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
या वेळी मान्यवरांनी सांगितले की, हा उपक्रम अत्यंत प्रशंसनीय आहे, आशा आहे की हा उपक्रम समाजाला नवी दिशा देईल. कार्यक्रमात व्यापारी संघाचे पदाधिकारी, सदस्य, सामाजिक कार्यकर्ता, मुस्लिम समाज बंधू आणि गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जश्ने ईद मिलादुन्नबी सेंट्रल कमेटीचे अध्यक्ष जमील शेख, उपाध्यक्ष मोईन काजी, सचिव मो. शेख आणि पदाधिकारीगण अरीफ उर्फ छोटुभाई, अयुब खान,मोहम्मद शेख,अशफाक शेख, राहिल पटेल,शाहीद अख्तर, पाशा काजी, बशीर अन्ना, दाऊद खान, नदीम शेख, मोहसीन रजा, शाकीर शेख,नसीम कादरी,बशीर कुरेशी, मेहमूद शेख, सोहेल शेख, हसन शेख इत्यादींनी योगदान दिले.
Comments
Post a Comment