*कुष्ठरोग मुक्त अभियानांतर्गत कैद्यांची कुष्ठरोग तपासणी*

*कुष्ठरोग मुक्त अभियानांतर्गत कैद्यांची कुष्ठरोग तपासणी*

अकूंश अवथे चंद्रपूर 

चंद्रपूर, दि.12 :   कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र या अभियान अंतर्गत जिल्हा कारागृहात कैद्यांची कुष्ठरोगाकरीता तपासणी करण्यात आली. सहाय्यक संचालक (कुष्ठरोग), पर्यवेक्षकिय नागरी कुष्ठरोग पथक, कारागृह प्रशासन व चंद्रपूर महानगरपालिका आरोग्य‍ विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर जिल्हा कारागृहातील 240 पुरुष कैदी 27 महिला कैदी असे एकूण 267 कैद्यांची तपासणी करण्यात आली.

त्यामधून 25 कैद्यांना त्वचा रोगाचे आजार असल्याचे निदर्शनास आले व त्यापैकी 7 कैद्यांना कुष्ठरोग तपासणी करीता वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूर च्या त्वचारोग विभागात तपासणी करीता संदर्भित करण्याबाबत सुचित करण्यात आले. सन 2027 पर्यंत कुष्ठरोग प्रसार शुन्यावर आणण्याकरीता सदर मोहीम हे आश्वासक पाऊल आहे.

कुष्ठरोग तपासणी शिबिराच्या कार्यक्रमात  जिल्हा कारागृहाचे तुरुंगाधिकारी श्री. सोनवणे, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. संदिप गेडाम, डॉ. टेंभुर्णे, डॉ. पाल व डॉ. अस्थी तसेच कुष्ठरोग विभागाचे आर.एस त्रिपुरवार, पी.के मेश्राम, श्रीमती  वराडे, अश्विनी जाधव, विभा वाढई आदी कर्मचारी उपस्थित होते. 

०००००

Comments