वरोरा येथे सेवानिवृत्त शिक्षकाला तीन अज्ञात तरुणांनी मारहाण; तोंडाला व डोळ्याला गंभीर दुखापत

वरोरा येथे सेवानिवृत्त शिक्षकाला तीन अज्ञात तरुणांनी मारहाण; तोंडाला व डोळ्याला गंभीर दुखापत वरोरा (जि. चंद्रपूर) – येथील कृष्ण नगरी परिसरात योग वर्गासाठी जात असताना एका सेवानिवृत्त शिक्षकाला तीन अज्ञात तरुणांनी अडवून त्यांची बेदम मारहाण केली. या घटनेत शिक्षकांचे तोंड फुटून रक्तस्त्राव झाला असून डाव्या डोळ्याला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. विलास दशरथ हजारे (वय 61, सेवानिवृत्त शिक्षक, रा. कृष्ण नगरी, वरखडे लेआउट, टिळक वार्ड, वरोरा) हे पतंजली योग संस्थेचे निःशुल्क योग वर्ग घेतात. दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी सकाळी साधारणतः 5.15 वाजता ते योग वर्गासाठी घरून पायी निघाले. कृष्ण नगरी बोर्डाजवळ हायवेवर आल्यावर त्यांच्या लक्षात आले की, एका दुचाकी मोपेडवर तीन अनोळखी इसम उभे होते. त्यांनी लाल रंगाचे टी-शर्ट परिधान केले होते, तोंडाला कापड बांधले होते, तिघेही सडपातळ बांध्याचे असून वय अंदाजे 22 ते 25 वर्षे होते. विलास हजारे यांना आशीर्वाद लेआउटच्या बोर्डाजवळ जाऊ देऊन तिघेजणही मोपेडने त्यांच्या मागून आले व त्यांची दुचाकी समोर आडवी करून त्यांना अडविले. त्यानंतर त्यांनी शिक्षकांना उद...

सर्व समाजांचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय - खा. प्रतिभा धानोरकर.भोई समाजाच्या सामाजिक सभागृहाचा लोकार्पण सोहळा.

सर्व समाजांचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय - खा. प्रतिभा धानोरकर.
भोई समाजाच्या सामाजिक सभागृहाचा लोकार्पण सोहळा.
वरोरा 
चेतन लुतडे 
खासदार म्हणून सर्वच समाजाच्या, जातीच्या व धर्माच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबध्द असल्याचे मत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी कोरपना तालुक्यातील लखमापूर येथे आयोजित भोई समाजाच्या सामाजिक सभागृहाच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी व्यक्त केले.

2024 च्या निवडणूकीत मला सर्वच समाजाच्या नागरीकांनी भरभरुन मत रुपी आर्शिवाद दिला. विशेषतः 2019 व 2024 च्या दोन्ही निवडणूकीत राजुरा विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनी दाखविलेल्या प्रेमासाठी मी आयुष्यभर ऋणी राहील. मी प्रत्येक धर्माच्या जातीच्या नागरीकांसाठी सर्वांगीण विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करणार आहे, असे मत देखील यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले. यावेळी लखमापूर येथे आदिवासी समाजाचे दैवत असणाऱ्या वीर बाबुराव शेडमाके यांच्या पुतळ्याचे देखील अनावरण करण्यात आले.

याप्रसंगी मंचावर आमदार सुभाष धोटे, राजुरा नगरपरिषद चे माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांचा लखमापूर वासीयांतर्फे सत्कार देखील करण्यात आला.

Comments