यूएई शाळेमधील सीबीएससी क्लस्टर योगा कॉम्पिटिशन स्पर्धेत भारतीय कन्यचे प्राविण्य.


यूएई शाळेमधील सीबीएससी क्लस्टर योगा कॉम्पिटिशन  स्पर्धेत भारतीय कन्यचे प्राविण्य. 

वरोरा 
चेतन लुतडे 

मूळ भारतीय असलेली कु. साजिरी वैभव सूकेश पावडे यूएई येथील आंतरशालेय योगा स्पर्धेत पदक प्राप्त केल्याने अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

गेले सहा  वर्षापासून अबुधाबी यूएई  येथील शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या साजिरी भारतीय कन्येने   वरोर्याचे नाव उंचावले  आहे. भारतातील योगशास्त्राचे  धडे प्राप्त करून अथक मेहनत करत आंतरशालेय योगा स्पर्धेत ब्रोंस पदक आपल्या सनराइज् इंटरनॅशनल शाळेसाठी मिळवून दिले आहे. 
ही आंतरशालेय योगा स्पर्धा अबुधाबी येथील शाळेमध्ये घेण्यात आली होती. शाळेतील बऱ्याच विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग दर्शवला होता. या सर्व विद्यार्थ्यांमध्ये भारतीय कन्या साजिरी वैभव पावडे हिने अंडर १७ मध्ये  ब्रांन्झ मेडल प्राप्त करत आपल्या शाळेबरोबरच वरोर्याचे नाव सुद्धा उंचावले आहे. सध्या ती ग्रेड सहा म्हणजे  सहाव्या वर्गांचे शिक्षण सनराइज इंटरनॅशनल शाळेत घेत आहे. साजिरी (सूकेश) वैभव पावडे मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील रहिवासी असून वैभव पावडे हे अबुधाबी येथे कार्यरत आहे. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षापासून ते अबुधाबी येथे राहत आहे.  या स्पर्धेमध्ये प्राविण्य प्राप्त केल्याने भारतातील मित्र परिवाराने या कन्येचे सोशल मीडियावरून अभिनंदन केले आहे .तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते, शहर प्रमुख राजू डांगे यांनी अभिनंदन  केले आहे.

Comments