*श्री चक्रधरस्वामी अवतार दिनाचा कार्यक्रम संपन्न**अखिल भारतीय महानुभाव परिषदेतर्फे संत, महंत, वासनीकांचा भेटकाळ सोहळा*

*श्री चक्रधरस्वामी अवतार दिनाचा कार्यक्रम संपन्न*

*अखिल भारतीय महानुभाव परिषदेतर्फे संत, महंत, वासनीकांचा भेटकाळ सोहळा*

अतुल कोल्हे भद्रावती :-
        दी. ८ सप्टें ला पोलिस वेल्फेयर हाल, चंद्रपुर येथे श्री चक्रधरस्वामी अवतार दिन कार्यक्रम हा नुकताच सम्पन्न झाला. 
कार्यक्रमात महानुभाव पंथाचे चंद्रपूर् तथा गढ़चिरौली जिल्यातून संत, महंत तथा भाविक भक्त उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजक चंद्रपूर्-गढ़चिरोली जिल्हा अखिल भारतीय महानुभाव परिषद चे अध्यक्ष तथा श्रीकृष्ण मंदिर लोणारा भद्रावती चे संचालक पू म दिवाकरबाबा गुर्जर होते. 
सदर कार्यक्रमाला चंद्रपूर् जिल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थिती दर्शवित त्यांचे हस्ते  स्वामीलीळा या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले, आपल्या भाषणात त्यांनी चक्रधर स्वामी यांच्या विचारांचा आपण भान ठेवला पाहिजे,त्यांचे विचार हे आपल्या जीवनात नवी दिशा आणि  नवी ऊर्जा निर्माण करण्यास मदत करते, असे संबोधित केले. 

सदर मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून् प पू प म माहुरकर बाबा माहूर, न्यासबाबा मकरढोकड़ा, एकोव्यासबाबा खुटाडा, मुधोव्यासबाबा वरोरा, विनोदराज शास्त्री करणवाडी, कृष्णराज दर्यापुरकर चंद्रपुर, संतोषशास्त्री दर्यापुरकर तसेच तपस्वी गीताताई पंजाबी, वंशिका पंजाबी, आणि समस्त संत,महंत, तपस्वीनि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोदराज शास्त्री तर् आभार  संतोषशास्त्री दर्यापुरकर यानी केले.

या कार्यक्रमातील भव्य शोभा यात्रेला चंद्रपुर वासीयांनी उपस्थिती दर्शवून संत महंत याचा आशीर्वाद घेतला.

Comments