अतुल कोल्हे भद्रावती :
तालुक्यातील गट ग्रामपंचायत मोहबाळा येथील विद्यमान सरपंच सुनंदा राहुल वाघ यांच्या विरोधात मोहबळा ग्रामपंचायतच्या ६ सदस्यांनी २८ ऑगस्टला तहसीलदार यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव अर्ज सादर केला. सरपंच सुनंदा राहुल वाघ यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली त्यांना दिनांक १ सप्टेंबरला अविश्वास ठरवायच्या अनुषंगाने विशेष सभा घेऊन दुपारी २ वाजता ग्रामपंचायत कार्यालय मोहबाळा कार्यालयात १ विरुद्ध ६ मतांनी अविश्वास ठराव पारित करण्यात आला.
या अविश्वास प्रस्तावाची प्रक्रिया निर्णय अधिकारी प्रभारी तहसीलदार सुधीर खांडरे, तलाठी रवींद्र तलार, ग्रामसेवक राकेश साव यांनी प्रक्रिया पार पाडली. अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने सरपंच सुनंदा वाघ यांच्या विरोधात विठ्ठल चवरे ,सिद्धांत पेटकर, नितीन परचाके, प्रतीक्षा खोंडे, संध्या साखरकर, साधना गेडाम या सदस्यांनी मतदान केले.
Comments
Post a Comment