वरोरा येथील कु. आरोही डुकरे नुत्य क्षेत्रात सर्वोत्कृष्ट पुरस्काराने सन्मानित

वरोरा येथील कु. आरोही डुकरे नुत्य क्षेत्रात सर्वोत्कृष्ट पुरस्काराने सन्मानित 

वरोरा :  नागपूर येथील सोनेरीपहाट बहुद्देशीय संस्था व्दारा आयोजित फ्लॉलेस मिस, मिसेस, किड्स इंडियन सर्वोत्कृष्ट विजेता पुरस्कार 2024 या कार्यक्रम नागपूर येथील शुभारंभ सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. रेखा भोंगाडे. अध्यक्ष सोनेरीपहाट बहुद्देशीय संस्था नागपुर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचा श्री गणेशा दिपप्रज्वलन करून करण्यात आले.
या वेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून सिनेअभिनेते सचिन दानाई, येहोवा येरे फाउंडेशन चंद्रपूरचे अध्यक्ष ऐलीजा बोरकुटे, धरमपेठ महिला बहुराज्य कंपनी नागपूर आणि भारत विकास परिषदेचे विभागीय सचिव निलीमा बावने, प्रभावशाली महिला व्यावसायिका दिपावली चौधरी यांच्या मुख्य उपस्थिती या मध्ये विविध कला क्षेत्रातील कलाकारांना सर्वोत्कृष्ट पुरस्कार देण्यात आले. यामध्ये विविध जिल्ह्यातील विविध कलाकार चा सहभाग होता. त्यात वरोरा येथील "आरोही कमलाकर डुकरे" हिला नुत्य क्षेत्रात सर्वोत्तम नुत्य कला सादरीकरण केल्याबद्दल प्रसिद्ध सिनेअभिनेते सचिन दानाई यांच्या हस्ते 
सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले तसेच फॅशन शोमध्ये तिला ज्युनिअर मिस दिवा असे सब टायटल देण्यात आले. यावेळी परिक्षक म्हणून सोहेल शेख, डॉ. रश्मी तिरपुडे, प्रार्थना मेश्राम, अनुरिता ढोलकीया यांनी सदर कार्यक्रमाचे परीक्षण योग्यरीत्या पार पाडले. आरोही ने आपल्या यशाचे श्रेय तिचा छोटा भाऊ अधिराज डुकरे, आई सौ. आरती डुकरे व वडील श्री. कमलाकर डुकरे यांना दिले. तिच्या या कलेचं भरभरून कौतुक सर्वत्र सर्वजण करत आहेत

Comments