गांधी चौकात पानठेल्यासमोर सुरू होता सट्टापट्टीचा अड्डा; पोलिसांच्या छाप्यात एक जुगारी ताब्यात, रोख रक्कम जप्त

गांधी चौकात पानठेल्यासमोर सुरू होता सट्टापट्टीचा अड्डा; पोलिसांच्या छाप्यात एक जुगारी ताब्यात, रोख रक्कम जप्त वरोरा, दि. २० एप्रिल २०२६: शहरातील गांधी चौक परिसरात पानठेल्याच्या आडून सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा मारून कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एका संशयित जुगारीला ताब्यात घेत त्याच्याकडून सट्टापट्टीचे साहित्य व रोख रक्कम हस्तगत केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २० एप्रिल रोजी पोलीस हवालदार संदीप विठ्ठल मुळे (बं.नं. २५७१) व त्यांच्या पथकातील अंमलदार मनोज ठाकरे व विशाल राजुरकर हे खाजगी वाहनाने शहरात अवैध जुगार प्रतिबंधासाठी गस्त घालत होते. यादरम्यान पोलिसांना मुखबिरामार्फत माहिती मिळाली की, मौजा गांधी चौक येथील पानठेल्यासमोर शेख अरबाज नावाचा एक इसम लोकांकडून पैसे घेऊन टाईम बाजार सट्टापट्टी आकड्याचा जुगार खेळवत आहे. माहितीची पडताळणी करण्यासाठी पोलिसांनी दोन स्वतंत्र साक्षीदारांना पंच म्हणून बोलावले. पंचांसह पोलीस पथकाने सदर ठिकाणी धाड टाकली असता, तेथे ...

तायक्वांदो स्पर्धेत लोकमान्य विद्यालयाचे अनामिका व कार्तिक विभागस्तरावर*

*तायक्वांदो स्पर्धेत लोकमान्य विद्यालयाचे अनामिका व कार्तिक विभागस्तरावर*

अतुल कोल्हे भद्रावती :-
              जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथील कु.अनामिका कैलास कापसे व कार्तिक पांडुरंग शहारे या खेळाडूंनी बाजी मारली असून ते आता विभाग स्तरावर खेळणार आहे.
     तायक्वांदो स्पर्धेत १७ वर्षाखालील गटात अनामिका कापसे व १४ वर्षाखालील गटात कार्तिक शहारे या खेळाडूंनी जिल्हास्तरावर विजेतेपद मिळवले यानंतर हे दोनही खेळाडू विभाग स्तरावर चंद्रपूर जिल्ह्याचे नेतृत्व विभागस्तरावर करणार आहे. विजयी खेळाडूंचे लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार, प्राचार्य सचिन सरपटवार, उपप्राचार्य रूपचंद धारणे, पर्यवेक्षक प्रफुल वटे, क्रीडा विभाग प्रमुख विशाल गावंडे, रविंद्र नंदनवार व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंदांनी अभिनंदन केले. व पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या. खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक सतिश खेमस्कर, प्रणाली पिंपळकर, हेमंत कोवे यांना दिले.

Comments