वर्धा पावर आणि जीएमआर कंपनी समोरील खराब रोडमुळे अपघातांची शक्यता. प्रवासी जीव मुठीत धरून करतात प्रवास.
वरोरा
चेतन लुतडे
तालुक्यातील मोहबाळा आणि दहेगाव येथील रहवाशांना जीव मूठीत धरून प्रवास करावा लागत आहे. तालुक्यातील मोहबाळा आणि दहेगाव ला जाणारा डांबरी रोड अतिशय खराब झाला असून कित्येक दिवसापासून प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. एक किलोमीटरच्या या रोड मध्ये नेहमी कोळशाची जड वाहतूक सुरू असते. जी एम आर आणि वर्धा पावर येथील हजारो कर्मचारी नेहमी दुचाकीने प्रवास करीत असतात. मोहबाळा आणि दहेगाव येथील रहिवाशी सुद्धा याच मार्गाने जावे लागते. या रोडवरती अर्ध्या ते एक फुटाचे गड्ढे पडले असून पावसाने गड्ढे भरल्यानंतर ते दिसत नाही. इतर वेळी ट्रकांची उडवलेली धूळ इतकी असते की दुचाकी स्वारला पुढचे दिसतच नाही. यामुळे त्या ठिकाणी बरेच अपघात झाले असून या रोडचे दुरुस्ती करण करणे अति आवश्यक असल्याचे मत येथील नागरिकांनी केले आहे.
काँग्रेस नेते राजूभाऊ चिकटे यांनी या रोडची दखल घेतली असून लवकरच प्रशासनाला या रोडचे नूतनीकरण करण्यासाठी निवेदन देणार असल्याचे सांगितले आहे.
-------------------------------------------
Comments
Post a Comment