सन २०२३-२०२४ मध्ये कपाशी सोयाबीन व तुर या पिकाची वन्य प्राण्यांनी नुकसान केल्यामुळे नुकसान पातळीचा सर्व्हे करून अजुन पर्यंत कोणतीही कार्यवाही न केल्याने शेतकरी चिंतेत

सन २०२३-२०२४ मध्ये कपाशी सोयाबीन व तुर या पिकाची वन्य प्राण्यांनी नुकसान केल्यामुळे नुकसान पातळीचा सर्व्हे करून अजुन पर्यंत कोणतीही कार्यवाही न केल्याने शेतकरी चिंतेत

शेतकऱ्यांचे खासदाराकडे निवेदन

वणी 
प्रतिनिधी

वणी -सन २०२३-२०२४ या शेती हंगामासाठी मौजा नायगाव खु. या शेत शिवारात वन्यप्राणी रान डुक्कर निलगाय यांनी मोठ्या प्रमाणात कपाशी, तुर व सोयाबीन या पिकाची हाणी केली असुन शेतातील पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान केली होती. त्याची लेखी तक्रार शेतक-यांनी वनविभागाकडे करण्यात आली होती. त्यानंतर वनविभागामार्फत नुकसान पातळीचा सर्व्हे केला परंतु आज पर्यंत त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही.

यावर्षी सन २०२४ मध्ये ऑगस्ट महिन्यात रानडुक्कर, निलगाय यांनी कपासी व सोयाबीन व तुर या पिकाचे दररोज नुकसान करून पिकाची नासधूस करणे सुरू आहे. मागील वर्षी अर्ज करून सुध्दा आपण कोणतीही कार्यवाही केली नाही. म्हणुन साधे अर्ज करून कोणतीही कार्यवाही होत नाही तर आम्ही करावे तरी काय असा प्रश्न शेतकरी म्हणुन आम्हाला पडला आहे.

सरकारच्या फुकट अनेक योजना असल्या तरी शेतक-यासाठी अंमलबजावणी होन नाही म्हणुन शेतकरी आत्महत्या करतो मात्र सरकारी अधिकारी नेते लोक समाजातील इतर लोकांना अनुदान खाण्याची सवय लागली आहे. म्हणुन निवेदन सुरू आहे वास्तविक पाहता आम्ही कोणतही हमी नसतांना शेतीत पैसे लावून शेती पेरतो पैसे उसनवार घेवून उधारवाडीवर घेऊन बियाणे, खत, औषधीवर खर्च करतो. कधी कमी पाऊस तर कधी जास्त पाऊस यातून वाचलो तर विज पडेल पुर येणे जंगली जनावराने पिकाचे नुकसान होणे यातुन काही पिक हातात आले तर सरकार व व्यापारी * बाजारात भाव पाडून लूट करतात. त्यामुळे आमचा आधार घेणारे कोणी नाही. कशाची हमी नाही. अशा परिस्थित शेती कशी करायची कुटुंब कसे चालवायचे मुलांचे शिक्षण, आरोग्य लग्न समारंभ कसे करायचे असे अनेक प्रश्न शेतक-याच्या समोर असताना समाजातील काही समुह व शासन आमची थट्टा उडवित असते.
एक महिन्याच्या आत शेतकऱ्यांचा प्रश्न निकाली सुना लावल्यास भव्य आंदोलन उभारण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. 
यासंबंधीचे निवेदन खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्याकडे देण्यात आले. 

Comments