*ग्राहक पंचायतचा सुवर्ण महोत्सव कार्यक्रम ४ सप्टेंबरला**अखिल भारतीय ग्राहक पंचायत भद्रावतीचे आयोजन*

*ग्राहक पंचायतचा सुवर्ण महोत्सव कार्यक्रम ४ सप्टेंबरला*

*अखिल भारतीय ग्राहक पंचायत भद्रावतीचे आयोजन*

अतुल कोल्हे भद्रावती :-
            स्थानिक अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने सुवर्ण महोत्सवी समापन वर्षानिमित्ताने स्थानिक श्री निळकंठराव शिंदे महाविद्यालयाचे इंडोअर स्टेडियम येथे विशेष मार्गदर्शन व स्मरणिका प्रकाशन सोहळा आयोजीत करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे राहणार आहेत. प्रमुख उद्घाटक म्हणून चंद्रपूरचे जिल्हाधिकारी  विनय गौंडा जी.सी., प्रमुख  वक्ते वीज ग्राहक गाऱ्हाणे  निवारण मंच पुणे व नाशिक झोनचे अध्यक्ष अजय भोसरेकर, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण  चंद्रपूर जिल्हाध्यक्ष, विदर्भ प्रांत अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे अध्यक्ष डॉ. नारायण गो. मेहरे यांचेसह चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे संघटन विदर्भ मंत्री डॉ. अजय गाडे, जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल बहादुरकर, विदर्भ प्रांत अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे सचिव नितीन काकडे , प्रभारी तहसीलदार सुधीर खंडारे, प्राचार्य डॉ. लेमराज लडके, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या चंद्रपूर सदस्य स्वाती देशपांडे,  विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे असे आवाहनअखिल भारतीय ग्राहक पंचायत, भद्रावती तालुका पदाधिकारी वामन नामपल्लीवार, पुरूषोत्तम मत्ते, वसंत वऱ्हाटे, प्रवीण चिमुरकर, शेखर घुमे, मोहन मारगोनवार आणि इतर पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Comments